बेंगळुरुहून UP ला जाणार्‍या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये घुमला रडण्याचा आवाज, ‘बाळ-बाळंतीण’ सुखरूप

बीना/सागर : बेंगळुरुहून उत्तर प्रदेशच्या मऊ येथे जाणार्‍या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये एका मुलीचा जन्म झाला. स्टेशन स्टाफने डॉक्टरांना बोलावून आणि सुरक्षित बाळंतपण करून ट्रेन झांसीसाठी रवाना केली. महिला आणि बाळ दोघे निरोगी आहेत.

07361 श्रमिक स्पेशल गाडी शनिवारी सकाळी झांसीकडे निघाली होती. ट्रेन सकाळी 4.35 वाजता मध्य प्रदेशच्या बीना येथे पोहचली. सिग्नल नसल्याने ट्रेन प्लॅटफॉर्म 3 व 4 च्या मध्ये मेन लाईनवर उभी होती. या दरम्यान बेंगळुरूहून मऊ कडे जाणारे संदीप मौर्य यांची पत्नी संगीता मौर्य यांना बाळंतकळा सुरू झाल्या. रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. अवधेश व स्टाफ नर्स स्टेशनवर पोहचले आणि कोचमध्ये सुरक्षित बाळंपण करण्यात आले.

प्राथमिक उपचार दिल्यानंतर जरूरी सामान ट्रेनमध्ये उपलब्ध करण्यात आले. यानंतर ट्रेन सकाळी 6.15 वाजता झांसीकडे रवाना केली.

दोन तासापर्यंत महिलेला उपचार देण्यात रेल्वे स्टाफ इतका व्यस्त होता की बाळाचा फोटोसुद्धा ते घेऊ शकले नाहीत. तेव्हा रेल्वे स्टाफने संदीपच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि नवजात बाळाचा फोटो पाठवण्यास सांगितले. संदीपने ट्रेनमध्ये सेल्फी काढला आणि व्हॉट्सअपवर पाठवला. सहायक मुख्य बुकिंग सुपरवायझर आशीष अवस्थी यांनी सांगितले की, महिला आणि तिच्या मुलीची प्रकृती ठिक आहे. पुढील स्टेशनवर त्यांची आरोग्य तपासण केली जाईल.

श्रमिकांसाठी रेल्वेने स्पेशल ट्रेन चालवली, परंतु या गाड्यांच्या कमी वेगामुळे मजूर प्रवासी संतपाले आहेत. जबलपुर रेल्वे मंडळाच्या विविध स्टेशनांवर नाराज लोकांनी इंजिनपासून रूळापर्यंत मोठा गोंधळ घातला. काही मजूरांनी इंजिनावर दगडफेक केली. एका घटनेत तर स्पेशल ट्रेनने मध्य प्रदेशच्या जबलपुरहून प्रयागराजचा 5 तासाचा प्रवास 23 तासात पूर्ण केला.