माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव, बॉसनं कर्मचार्‍याला सांगितलं अन् नंतर म्हणाला…

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला बॉसनेच माझ्या पत्नीशी शारीरीक संबंध ठेव, असे सांगितले. नंतर बॉसची पत्नी आणि या कर्मचाऱ्याचे संबंध वाढत गेले. दोघे एकमेकावर प्रेम करू लागले. यानंतर बॉसने हे संबंध तोडण्यास कर्मचाऱ्यास सांगितले. कर्मचाऱ्याने तसे केले सुद्धा, परंतु, बॉसच्या पत्नीने त्यास त्रास देण्यास सुरूवात केली. एकीकडून बॉसचा दबाव आणि दुसरीकडे त्याच्या पत्नीकडून होणारा त्रास यामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे.

या तरूणाचे नाव निखिल परमार आहे. मयत १९ वर्षीय निखिल अविवाहित होता. तो गोमतीपूर येथे रहातो. ऑक्टोबर २०१८मध्ये त्याने कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. दहा महिन्यानंतर त्याने बॉस आणि त्याची पत्नी त्रास देत असल्याने वडिलांना नोकरी सोडण्यासाठी परवानगी मागितली. वडिलांनीही त्यास संमती दिली होती.

१५ जुलै २०१९ ला बॉसने पगार घेण्यासाठी बोलावल्याने निखिल बाहेर पडला. नंतर त्याने आपण बॉसबरोबर निखिल परमारला राजस्थानला जात असल्याचे सांगितले. परंतु, २० जुलैला निखिलच्या बॉसने त्याच्या वडिलांना फोन करून निखिलने कंपनीच्या गोदामात आत्महत्या केल्याचे सांगितले. यामुळे संपूर्ण परमार कुटुंब हादरून गेले. तीन महिन्यानंतर निखिलच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या एका मेसेजमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नंतर पोलिसांनी तपास करून बॉस आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला.

निखिलच्या मृत्यूनंतर तीन महिन्यानंतर त्याचा भाऊ संजय आणि वहिनी निशा यांनी निखिलचा मोबाईल तपासला असता निखिलच्या आत्महत्येचे कारण त्यांना समजले. त्याने बॉसला पाठवलेला एक मेसेज वाचून या कुटुंबाला धक्काच बसला. या मेसेज मध्ये म्हटले होते की, तुम्ही मला तुमच्या बायकोवर प्रेम करायला सांगितले. मी ते केले. त्यानंतर तीसुद्धा माझ्या प्रेमात पडली. तुमच्या सांगण्यानुसार आम्ही शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तुम्ही मला तुमच्या पत्नीबरोबरचे संबंध संपवण्यास सांगितले. तुम्ही मला पगार देणार नाहीत अशी धमकीही दिली होती. कृपया, माझ्याशी गुलामासारखे वागू नका. माझ्यावर दया करा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/