मालकाला लागला गड्याच्या विश्वासाचा लळा, पण पैश्याच्या हव्यासापोटी गड्यानेच दाबला मालकाचा गळा…

दौंड : अब्बास शेख

त्या मालकाला आपल्या गड्यावर खूप विश्वास होता. कुठेही जाताना तो आपल्या गड्याला सोबत घेऊन जाई, कुठे कुणाला पैसे द्यायचे असतील, घ्यायचे असतील तरी आपला विश्वासू गडी ते सोबत घेऊनच जायचे. परंतु आपण जीवापाड जपलेला गडीच एक दिवस आपला घात करेल याची कल्पनाही त्या मालकाने कधी स्वप्नात केली नव्हती मात्र घडले मात्र तसेच.. ज्या मालकाने आपल्या गड्याला जीवापाड जपले त्या गड्यानेच अगोदर आपल्या मालकाचे अपहरण  केले नंतर पैसेही घेतले आणि निर्दयी पणे आपल्या मालकाचाच गळा दाबून या नात्यालाच संपवून टाकले.

हि हृदयद्रावक घटना दौंड तालुक्यातील खुटबाव येथील मयत हनुमंत निवृत्ती थोरात यांच्या सोबत घडली असून या प्रकरणी यवत पोलिसांनी थोरात यांच्याकडे कामास असणाऱ्या आरोपी सुरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ, वय.२८ वर्षे, हल्ली रा.सी-२, फ्लॅट नं.३, आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता.दौंड, जि.पुणे. मूळ रा.पिसोरे खांड, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर या गड्यासह रावसाहेब साहेबराव फुलमाळी, वय.३० वर्षे, सध्या रा.जुना एस.टी.स्टॅन्ड, पेडगाव, ता.श्रीगोंदा, ता.अहमदनगर. मूळ रा.घोडेगाव, चांदा, ता.नेवासा, जि.अहमदनगर, सौ, छकुली सुरज उर्फ पप्पू ओहोळ, वय.२३ वर्षे, सध्या रा.सी-२, फ्लॅट नं.३, आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता.दौंड, जि.पुणे. मूळ रा.पिसोरे खांड, ता.दौंड, जि.अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यातील चौथा आरोपी बापु भोईटे, रा.श्रीगोंदा, ता.अहमदनगर हा फरार झाला आहे.  आरोपींना पकडण्यासाठी यवत पोलिसांनी आपले संपूर्ण कसब पणाला लावले होते.

या घटनेची संपूर्ण हकीकत अशी…

हनुमंत निवृत्ती थोरात, वय.४५ वर्ष, रा.खुटबाव, ता. दौंड, जि.पुणे हे दि. ०५/०९/२०१८ पासून त्यांच्या मारुती एस क्रॉस या पांढऱ्या रंगाच्या गाड़ीसह बेपत्ता झाले होते.

सदर व्यक्तीबाबत यवत पोलिसांना घात-पाताचा संशय वाटल्याने पुढील तपास पो.नि. सूरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विनायक देवकर व गुन्हे शोध पथक यांचेकडे देण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी हनुमंत थोरात व त्यांचे गाडीचे फोटो सोशल मीडियावर पाठवले व त्याबाबत माहिती काळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. दि.१० सप्टेंबर रोजी एका नागरिकाने स.पो.नी. विनायक देवकर यांना फोन करून वरील पांढरे रंगाची एस क्रॉस गाड़ी ही हडपसर येथील मंत्री मार्केट येथे बेवारस लावलेली असल्याचे सांगितले. हि महत्वाची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने अत्यंत बारकाईने तपास करून प्रथमतः हडपसर येथे जाऊन गाड़ी ताब्यात घेतली यावेळी अधिक तपासात हनुमंत थोरात यांच्या जे.सी.बी. मशीनवर असणारा ड्रायवर सूरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ याचा त्यांना दाट संशय वाटल्याने त्याचा शोध सुरू केला यावेळी तो राशीन, अहमदनगर येथे येणार असल्याचे समजताच स.पो.नि.विनायक देवकर, पो.ना.संदीप कदम, गणेश पोटे, सुरेश दडस, सिमा आबनावे यांनी ३ दिवस राशीन अहमदनगर येथे थांबुन पप्पू ओहोळ यास अत्यंत शिताफिने ताब्यात घेतले त्यास पोलीसी ख़ाकया दाखवताच त्याने तोंड उघडून मी, माझा मित्र रावसाहेब फूलमाळी, बाप्पू भोईटे असे आम्ही तिघांनी आमच्यावर खुप कर्ज झाले असल्याने आम्हाला पैशांची खुप गरज होती म्हणून आम्ही तिघांनी पैशांच्या हव्यासापोटी मालक हनुमंत थोरात यांचे अपहरण करुन त्यांचे कडून २ लाख रुपये घेऊ असा कट रचला व सर्वांनी मिळून दि.०५ सप्टेंबर २०१८ रोजी मालक हनुमंत थोरात यांचे वाखारी, आनंदग्राम सोसायटी येथून त्यांचे गाडिसह अपहरण केले, यावेळी त्यांचे तोंड, हाथ-पाय बांधून त्यांना इंदापूर, सोलापूर असे फिरवत राहिले व त्यांच्या एका व्यावसायिकाकडून २ लाख रुपये घेऊन त्यांना पुन्हा सोलापूर दिशेने घेऊन गेले. आता पैसे तर मिळाले आहेत मग थोरात यांना सोडून देऊ म्हणून त्यांना दौंड कडे पुन्हा घेऊन निघाले.

[amazon_link asins=’B07CD2BN46,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c663af0b-b8f5-11e8-b71f-7b2ce2ecc1d7′]

दरम्यान खडकी रावणगाव येथे आल्यानंतर एकाने शंका उपस्थित केली कि पैसे तर मिळाले आहेत परंतु जर याने पोलिसांत तक्रार दिली तर??? आणि याच शंकेने वरील आरोपींनी हनुमंत थोरात यांचा गळा दाबून खून केला आणि मालक आणि गड्याच्या नात्याला काळिमा फासला. आरोपींनी थोरात यांचा खून करून त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी दि.६ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे पाटस येथील नवा मुठा उजवा कालवा येथे पाण्यात टाकून दिला व गाड़ी हडपसर मंत्री मार्केट येथे लाऊन पळून गेले.

[amazon_link asins=’B07CRGDR8L,B0751LSRGF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f4ca322-b8f3-11e8-8d36-53fbbd145f00′]
या सर्व आरोपींना पकडण्यासाठी यवतचे पो.नि.सूरज बंडगर, स.पो.नि.विनायक देवकर. सहा.फौजदार.जिजाराम वाजे, रमाकांत गवळी, पो.ना.संदीप कदम, गणेश पोटे, सुरेश दडस, दीपक पालखे, गणेश झरेकर, अभिजीत कांबळे, महेश बनकर. रंजीत निकम, दशरथ बनसोडे, सिमा आबनावे, पो.कॉ.संपत खबाले, विनोद रासकर, विशाल गजरे, हेमंत कुंजीर. प्रशांत कर्णावर यांनी विशेष मेहनत घेतली व आरोपींनी सांगितल्याप्रमाणे मृतदेह शोधण्यासाठी दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळीच सर्व पोलिस स्टाफ व हनुमंत थोरात यांचे नातेवाईकांनी मिळून थोरात यांचा मृतदेह शोधन्यासाठी पाटस येथील नवा मुठा उजवा कालव्याच्या कडेने शोध घेत असता शिर्सुफळ, बारामती, तलावाच्या कड़ेला कॅनलमधे एक मयत इसमाचा मृतदेह आढळून आला यावेळी थोरात यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह हनुमंत थोरात यांचाच असल्याचे ओळखले व एकच टाहो फोडला. ज्या धन्याने जीवापाड आपल्या गड्याला जपले त्या गड्यानेच असा घात केल्याने मालक आणि गड्याच्या नात्यालाच काळिमा फासला गेला आहे.

समाजातील ‘प्रतिष्ठीत’ चोरांकडून १०० गुन्हे उघडकिस, ३० लाखांचा एेवज जप्त