‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ वनस्पतीला शरद पवार यांचे नाव

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आता वनस्पतीशी जोडले गेले आहे. निसर्गसौंदर्यासह विविध दुर्मिळ वनस्पती, प्राणी अशा जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्री पर्वत रांगामध्ये कोल्हापूरच्या दोन संशोधकांनी एक नवी वनस्पती शोधली आहे. या वनस्पतीला या संशोधकांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले आहे. त्यामुळे ही वनस्पती आता अर्जेरिया शरदचंद्रजी या नावाने ओळखली जाणार आहे.

कोल्हापूरमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि त्यांचे सहकारी संशोधक डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती शोधली आहे. ही वनस्पती गारवेल कुळातील आहे. या वनस्पतीच्या शोधाची माहिती कालिकत विद्यापीठामधून प्रकाशित होणार्‍या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथामधून प्रकाशित करण्यात आली आहे.

द्राक्षाच्या जातीबाबत संशोधन, उत्पादन आणि निर्यातीसाठी विशेष योगदानाबद्दल यापूर्वी शरद पवार यांचे नाव बियारहीत द्राक्षाच्या जातीला शरद सिडलेस हे शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे.