परफेक्ट फिगरसाठी केली बट सर्जरी, मॉडलचा झाला मृत्यू

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था –   अनेक लोक आपले सौंदर्य वाढवण्यासाठी शरीराच्या काही भागांची प्लास्टिक सर्जरी करतात. परंतु कधी-कधी ही प्लास्टिक सर्जरी विरूद्ध परिणाम देते आणि चेहरा अगोदरपेक्षा खराब दिसू लागतो. मात्र, मेक्सिकोच्या एका इंस्टाग्राम मॉडलची प्लास्टिक सर्जरी इतकी बिघडली की, तिचा मृत्यू झाला.

30 वर्षांची जॉसलीन कॅनो हिला मॅक्सिकोची किम कार्दशियन सुद्धा म्हटले जाते. कॅनो मॉडलसह एक स्विमसूट डिझायनरसुद्धा होती. इंस्टाग्रामवर कॅनोचे जवळपास 13 मिलियन फॉलोअर्स आहेत, जे तिच्या सुंदर फिगरसाठी वेडे आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीला कॅनो आपल्या कॅलिफोर्निया येथील घरातून कोलंबिया येथे एक प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी गेली होती. कॅनो आपल्या बटचे ऑपरेशन करणार होती. ज्याप्रकारची सर्जरी कॅनो करत होती, तिच्यामध्ये शरीराच्या एका भागातील फॅट काढून प्लास्टिक सर्जरीवाल्या जागेवर लावले जाते.

या बट लिफ्ट सर्जरीच्या दरम्यान कॅनोच्या पोटातून हे फॅट काढून तिच्या नितंबावर लावले जात होते. आता वृत्त असे आहे की, या धोकादायक ऑपरेशनमध्ये कॅनोचा मृत्यू झाला आहे. अंदाजानुसार, अशाप्रकारच्या ऑपरेशनमध्ये 3000 माणसांमध्ये एका माणसाचा मृत्यू होतो.

कॅनोच्या कुटुंबियांकडून अजूनपर्यंत तिच्या मृत्यूबाबत दुजोरा मिळालेला नाही. परंतु, तिची सहकारी मॉडल लिरा मार्सरने ट्विटरवर या दु:खद घटनेची माहिती दिली. मार्सरने लिहिले, कोलंबियामध्ये सर्जरीच्या दरम्यान जॉसलीन कॅनोचा मृत्यू झाला, हे भयंकर आहे. ती अगोदरच इतकी सुंदर होती. तिच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करते, ती खुप चांगली होती.

फॅन्सने सुद्धा हा दावा केला आहे की, त्यांना यूट्यूबवर कॅनोच्या अंत्यसंस्काराचे फुटेज मिळाले आहे, जे तिच्या घराजवळच्या एका शवदाहिनीने अपलोड केले होते. या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, जॉसलनीचा 14 मार्च, 1990 ला जन्म झाला आणि 7 डिसेंबर, 2020 ला तिने अनंत जीवनात प्रवेश केला.

कॅनोच्या कुटुंबियांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही, पण तिचे इंस्टाग्राम पेज 7 डिसेंबरपासून अपडेट करण्यात आलेले नाही. कथित प्रकारे 7 डिसेंबरलाच कॅनोचा मृत्यू झाला होता.

कॅनोचे फन्स तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने खुप दुखी आहेत. आणि या गोष्टीची चर्चा करत आहेत की, अखेर तिला अशाप्रकारची धोकादायक सर्जरी करण्याची काय आवश्यकता होती. परंतु, ब्राझीलची बट लिफ्ट सर्जरी सेलेब्रिटीजमध्ये खुप लोकप्रिय आहे आणि नुकतेच ती केल्याने अनेक मृत्यूदेखील झाले आहेत.