Budget 2021 : बजेटच्या घोषणेनंतर पगार आणि रिटायरमेंट सेव्हिंगवर होईल परिणाम; वाचा किती पडणार फरक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या बजेटमधून पगारदार वर्गाला फटका बसण्याची शक्यता आहे. अडीच लाख वार्षिक प्रोव्हिडंट फंडावर (PF) टॅक्स लावण्याची सरकारने घोषणा केली आहे.

बहुतांश पगारदार वर्गासाठी रिटायरमेंटनंतरच्या बचतीसाठी पीएफ सर्वात चांगला पर्याय मानला जातो. पण नव्या वेज कोडपासून फक्त टेक-होम सॅलरी कमी होणार नाही तर रिटायरमेंट सेव्हिंगवरही याचा परिणाम होणार आहे.

आत्तापर्यंत टॅक्स फ्री रिटर्नसाठी प्रोव्हिडंट फंडच्या गुंतवणुकीवर कोणताही कॅप नव्हता. पण गेल्या वर्षी बजेटमध्ये प्रोव्हिडंट फंड स्कीम्सपासून जास्तीत जास्त 7.5 लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. आता कर्मचारी भविष्य निधीमध्ये (EPF) वर्षाला 2.5 लाख रुपये गुंतवणुकीनंतर पैसे काढताना टॅक्स द्यावा लागणार आहे.

कंपेन्सेशन रक्कम कमी झाल्याने वाढेल पीएफवरील योगदान

वेज कोड 2019 मुळे पीएफच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे योगदान वाढवता येऊ शकेल. त्यामुळे त्यांची टेक-होम सॅलरी कमी होईल. तसेच सरकारकडून एकूण कंपेन्सेशनच्या रकमेवर 50 टक्क्यांवर कॅप लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढेल आणि कर्मचाऱ्यांची टेक-होम सॅलरीही कमी होईल.

दरम्यान, या नव्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना बेसिक पेची रक्कम वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानात वाढ होईल.

असा होईल परिणाम…

वेज कोड 2019 लागू झाल्याने टेक होम सॅलरीमध्ये कपात होईल. समजा, अमित नावाच्या एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये आणि त्याचे योगदान 20,000 रुपये असेल तर त्यामध्ये वाढ होऊन 25,000 होईल. म्हणजेच त्याची टेक होम सॅलरी दर महिन्याला 5 हजार रुपयांनी कमी होईल. तसेच त्याचे पीएफवरील योगदान वर्षाला 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक होईल. त्यामुळे या नव्या नियमानुसार त्याला या रकमेवर टॅक्स द्यावा लागणार आहे.