फोन रिसीव्ह केला नाही म्हणून डोक्यात फोडली बाटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फोन केल्यानंतर उचलला नाही म्हणून एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात काचेची बॉटल फोडून त्याला जखमी केल्याची घटना वडगाव शेरी येथील न्याती मिडोज सोसायटी शेजारी असलेल्या गार्डनमध्ये रविवारी सायंकाळी घडली.

याप्रकऱणी १७ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम दिलीप इंगोले (वय २३, रा, केशवनगर मुंढवा याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय फिर्यादी युवकाला शुभम इंगोले याने फोन केला होता. तो त्याने उचलला नाही. त्यामुळे चिडलेला शुभम इंगोले रविवारी सायंकाळी वडगाव शेरी येथील न्याती मिडोज सोसायटीजवळ असलेल्या गार्डन मध्ये आला. तेथे अल्पवयीन युवक अंकित मांजरेकर होता. त्यावेळी चिडून त्याने अंकितच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्यात त्याच्या कपाळाच्या उजव्या बाजूला जखम झाली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

You might also like