मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर, मिनरल असणारा दुधी भोपळा आहे ‘या’ आजारांवर गुणकारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दुधी भोपळ्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल, कार्बोहायड्रेट यांचे भरपूर प्रमाण आहे. इंग्रजीत बॉटल गार्ड या नावाने दुधी भोपळ्याला ओळखले जाते. मानवजातीने सर्वप्रथम घेतलेले भाजीपाल्याचे पीक म्हणजे दुधी भोपळा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भोपळ्याच्या रसासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक संशोधन केले होते. या संशोधनात दुधी भोपळ्याच्या रसाचे फायदे सांगितले आहेत.

कमी मसाला घालून भोपळा उकडून त्याची भाजी खाल्ल्यास डायुरेटिक, डिप्रेशन या आजारांवर उपयुक्त आहे. पित्त दूर करणारी ही औषधी वनस्पती आहे. भोपळ्याचा रस काढून लिंबू रसासोबत रोज सकाळी एक ग्लास घेतल्यास हा रस नैसर्गिक अल्कलाझरचे काम करतो. लघवीत होणारी जळजळ काही क्षणांत दूर होते. डायरिया या आजारात भोपळ्याच्या रसात थोडे मीठ आणि साखर मिसळून दिल्यास ताबडतोब आराम मिळतो. भोपळ्याच्या रसात सीसम तेल मिसळून तळव्यांवर हळुवारपणे चोळल्यास चांगली झोप लागते.

मिरर्गी आणि अन्य आजारांत हा रस लाभदायक आहे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे विकार, अल्सर सारखे आजार भोपळ्याच्या रसाने लवकर बरे होतात. नियमित भोपळ्याची भाजी खाल्ल्याने जुनी बद्धकोष्ठताही दूर होते. याशिवाय याचा उपयोग वाद्ययंत्र म्हणून आणि कमंडलू म्हणून केल्याचे दिसते. नव्याने पोहायला शिकणारी मंडळीही याचा उपयोग करतात. सहज उपलब्ध होणारी ही भाजी अनेक आजारांना पळवून लावू शकते.