ICC World Cup 2019 : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ‘विराट’ विक्रम कॅप्टन कोहलीने मोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले आहे. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात कमी डावात जास्त धावा बनवण्याचा सचिन तेंडुलकचा विक्रम विराट कोहलीने मागे टाकला आहे. विराट कोहली ११ हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

सचिनला मागे टाक विराटने रचला इतिहास

विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये २२२ व्या डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ११ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला ५७ धावांची गरज होती. आज विश्वचषकाच्या २२ व्या सामना खेळताना विराटने हा इतिहास रचला आहे. विराट कोहलीने ५७ धावा पूर्ण करून ११ हजार धावांचा टप्पा पार केला. ११ हजार धावा करणारा विराट भारताचा तिसरा खेळाडू ठऱला आहे तर जगात ९ वा खेळाडू ठरला आहे. भारताकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांनी ११ हजार धावा केल्या आहेत.

एक दिवशीय सामन्यात कमी डावात ११ हजार धावा बनवणारे फलंदाज विराट कोहली (२२२ डाव, भारत), सचिन तेंडुलकर (२७६ डाव, भारत), रिकी पॉटिंग (२८६ डाव, ऑस्ट्रेलिया), सौरभ गांगुली (२८८ डाव, भारत), जॅक कॅलीस (२९३ डाव, दक्षिण आफ्रीका), कुमार संगकारा (३१८ डाव, श्रीलंका), इंझमाम उल हक (३२४ डाव, पाकिस्तान), सनथ जयसूर्या (३५४ डाव, श्रीलंका), महेला जयवर्धने (३६८ डाव, श्रीलंका)

सिने जगत –

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल