ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरच्या ‘या’ वर्ल्ड रेकॉर्डवर टांगती ‘तलवार’, फायनलमध्ये ‘फैसला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. मात्र माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड या स्पर्धेत तुटणार की नाही याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. फायनलमधील न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघातील प्रत्येकी एका खेळाडूंकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा सचिनच्या नावे

वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम हा सध्या सचिन तेंडुलकरच्या नावे असून त्याने २००३ मधील वर्ल्डकप स्पर्धेत त्याने सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. तर या वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या रोहित शर्मा याने सर्वाधिक ६४८ धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ६३८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता त्यांना हा विक्रम मोडण्याची संधी नाही. रोहित शर्मा हा रेकॉर्ड मोडण्यापासून २६ धावा तर डेव्हीड वॉर्नर २७ धावांनी मागे राहिले. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी हा रेकॉर्ड मोडला नसला तरी न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघातील दोन खेळाडूंना हा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हा रेकॉर्ड मोडला जातो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या दोन खळाडुंकडे संधी

सचिन तेंडुलकर याचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी ही न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि इंग्लंडचा फलंदाज जो रूट यांच्याकडे आहे. त्यासाठी दोघांनाही अंतिम सामन्यात शानदार शतकी खेळी करून उत्तम कामगिरी करावी लागेल. जो रूट याने आतापर्यंत या स्पर्धेत १० सामन्यांत ५४९ धावा केल्या असून त्याने अंतिम सामन्यात १२५ धावा केल्यास आणि केन विलियमसन याने १२४ धावा केल्यास हा रेकॉर्ड तुटणार आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये कोण शतक झळकावत हा रेकॉर्ड मोडणार. दोघेही या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असून उद्या या दोघांच्या खेळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’