रोहित शर्मानं एकाच दिवसात केले होते वनडे क्रिकेटमध्ये दोन विश्व रेकॉर्ड, आजपर्यंत आहे अतूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा खेळामध्ये चांगली कमाल करतो. फलंदाज म्हणून खेळ किंवा कर्णधार म्हणून मैदानावर उतरणारा रोहित नेहमीच विरोधी संघाला भारी पडतो. आम्ही हे हवेत बोलत नाही तर रोहित शर्माचे हे आकडे सांगत आहेत. हिटमॅन रोहित आयपीएलचा सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार आहे, तर वनडे क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक दुहेरी शतके मारण्यासाठी ओळखला जातो. इतकेच नाही तर टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारण्याचा विश्व रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, रोहित शर्माने एकाच दिवसात वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन विश्व रेकॉर्ड केले होते.

रोहित शर्माने यापूर्वी आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे दुहेरी शतक पूर्ण केले होते आणि अशा प्रकारे वनडे क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त डबल शतक मारणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला होता. रोहितची बॅट इथेच थांबली नाही, रोहितने या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांचा भयंकर समाचार घेतला आणि एकूण 264 धावा केल्या. अशाच प्रकारे रोहितने एकाच दिवसात दोन जागतिक रेकॉर्ड नोंदवले, कारण वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी किंवा नंतर कोणत्याही फलंदाजाने इतका मोठा डाव खेळला नव्हता. 6 वर्षांनंतरही कोणीही या विश्व रेकॉर्डच्या आसपासही पोहाेचू शकला नाही. स्वतः रोहितनेही दुहेरी शतक झळकावले आहे, परंतु 264 धावांच्या आस-पास पोहाेचू शकला नाही.

13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचे म्हणले, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 244 धावांच्या डावाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 404 धावा केल्या होत्या. यांना प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेची टीम अवघे 251 धावा करून ढासळली आणि 153 धावांच्या फरकाने सामना गमावला. श्रीलंकेची टीम रोहित शर्माच्या धावांवर 13 धावांनी मागे राहिली होती.