आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  केंद्र सरकार थिएटरमधील लोकांची संख्या ही 50 टक्क्यांहून जास्त करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत आहे. परंतु या सोबत सिनेमागृहांना कठोर गाईडलाईन्सचंही पालन करावं लागणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय नवीन गाईडलाईन्स जारी करणार आहे.

2020 मध्ये देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर देशभरातील थिएटर्स बंद करण्यात आले होते. 15 ऑक्टोबर पासून केंद्र सरकारनं सशर्त थिएटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली. यासाठी काही गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या होत्या. गाईडलाईन्स नुसार, सर्व थिएटर्सनं आपल्या क्षमतेच्या 50 टक्के सीट बुक करणं अपेक्षित होतं. परंतु आता नव्या परिस्थितीत सरकार ही संख्या वाढवत आहे. गृह मंत्रालयानं स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर निर्देश जारी केले आहेत ज्यात सांगितलं आहे की, संक्रमित किंवा प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर सर्व हालचाली सुरू राहतील. काही अ‍ॅक्टीव्हिटी करताना दिलेल्या एसओपींचं पालन करावं लागणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सिनेमागृहांना आधीच 50 क्षतमेनं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता ते प्रेक्षकांची संख्या वाढवू शकतात. परंतु यासाठी संशोधित एसओपीचं पालन करणं गरजेचं आहे जे माहिती आणि प्रसारण मंत्रालय जारी करणार आहे.

या निर्णयानंतर निश्चित फिल्म इंडस्ट्रीला बळ मिळेल यात शंका नाही. कारण यामुळं आता फिल्ममेकर्स मोठे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज करू शकणार आहेत. यासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही. थिएटर सुरू झाल्यानंतर काही कमी बजेटचे सिनेमे रिलीज झाले आहेत. परंतु बिग बजेट सिनेमे अजून रिलीज झालेले नाहीत. थिएटर मालकांचं म्हणणं आहे की, सिनेमागृहांना पुन्हा उभारी येण्यासाठी सुपरस्टार्सचे मोठे सिनेमे थिएटरमध्ये लावले जाणं गरजेचं आहे.

अद्याप अनेक सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. यात सलमान खानचा राधे हा सिनेमा आहे, जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2, कंगना रणौत चा धाकड, शाहिद कपूरचा जर्सी, अजय देवगणचा मैदान आणि एस एस राजमौली यांच्या आरआरआर सिनेमाचा समावेश आहे. 13 जानेवारी 2021 रोजी मास्टर हा तमिळ सिनेमा सिनेमागृहाता रिलीज झाला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.