Box Office Record | रणबीर-आलियाच्या Brahmastra च्या समोर फेल झाला अल्लू अर्जुनचा Pushpa, बॉलीवुडचाच डंका

0
774
Box Office Record | ranbir kapoor alia bhatt brahmastra beats allu arjun movie pushpa the rise on his first weekend details here
file photo

नवी दिल्ली : Box Office Record | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ’ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Record) चांगली कमाई करत आहे. अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ओपनिंग वीकेंड धमाकेदार ठरला आहे. बॉलीवूडच्या बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये, या चित्रपटाने आधीच जगभरात 200 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे. एवढेच नाही तर कमाईच्या बाबतीत ब्रह्मास्त्र चित्रपटाने साऊथच्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे (Ranbir Kapoor Alia Bhatt Brahmastra Records).

बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये रणबीर कपूरचा हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अनेक जुने रेकॉर्ड मोडत आहे. एकीकडे रणबीरच्याच ’संजू’ (Sanju) चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला असतानाच दुसरीकडे आता रणबीरचा हा चित्रपटावर दाक्षिणात्य चित्रपटांवर (South Movies) सुद्धा भारी पडत असल्याचे दिसत आहे. ओपनिंग वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत ब्रह्मास्त्रने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (South Superstar Allu Arjun) ’पुष्पा’ (Pushpa) चित्रपटालाही मागे टाकले आहे. (Box Office Record)

अल्लू अर्जुनच्या ’पुष्पा’ चित्रपटाला मागे टाकले

अयानच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने रविवारी तिसर्‍या दिवशी 46 कोटींचा व्यवसाय केला आहे.
यासह चित्रपटाचे फर्स्ट वीकेंड कलेक्शन एकूण 125 कोटींवर पोहोचले आहे. दुसरीकडे, अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन सुमारे 110 कोटी होते.

कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया 2 हा एकमेव चित्रपट होता ज्याने पहिल्या वीकेंडला 100 कोटींचा टप्पा पार केला.
आता अल्लू अर्जुनच्या ’पुष्पा’ला मागे टाकत रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ’ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Web Title :- Box Office Record | ranbir kapoor alia bhatt brahmastra beats allu arjun movie pushpa the rise on his first weekend details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uric Acid | महिलांमध्ये किती असावे यूरिक अ‍ॅसिड? पहा कंट्रोल करण्यासाठी चार्ट

Eggs And Cholesterol | अंडे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते का? जाणून घ्या कोणते फूड्स आजपासूनच डाएटमधून हटवले पाहिजेत

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! बनावट कागदपत्राद्वारे शिपायाने दिले कंत्राटी ग्रामसेवक भरतीचे आदेश, दापोडी उपनिबंधक कार्यालयातील प्रकार