‘भावा’ च्या जागी ‘बॉक्सिंग’ खेळायला गेलेल्या ‘बॉक्सर’ चा रिंगमध्ये ‘मृत्यू’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिडा क्षेत्रात खेळाडूंबद्दल अनेकदा अशा घटना घडतात की जेथे अनेक खेळाडू खेळतानाच आपला जीव गमावतात. असाच प्रकार बॉक्सिंग रिंग मध्ये झाला आणि व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला. एका प्रोफेशनल फाइटमध्ये एका बॉक्सरला आपला जीव गमावावा लागला. परंतू मृत्यनंतर खुलासा झाला की, तो बॉक्सर ज्याचा मृत्यू झाला असे कळवण्यात आले तो जिवंत आहे, आणि ज्याला आपला जीव गमवावा लागला तो त्यांच्या लायसेंसवर खेळत असणारा त्याचा भाऊ आहे.

ही घटना बुल्गारिया येथे घडली. तेथील एका व्यवसायिक सामन्यात जखमी झालेल्या बोरिसने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने इस्स ने खुलासा केला की बोरिस वर्ष भरापासून त्याच्या लाइसेंसवर खेळत आहे. त्यांच्या नावे खेळणाऱ्या बोरिसच्या मृत्यूनंतर वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिलने 21 वर्षीय इस्सच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता. 21 वर्षीय इस्सने ही माहिती फेसबुकवर दिली. त्याने बीटीव्हीला सांगितले की बोरिस वर्षभरापासून त्यांचा लाइसेंसचा वापर करत होता. कारण तो त्याचे नाव सार्वजनिक करण्याआधी अनुभव घेऊ इच्छित होता.

बोरिस फेदरवेटमध्ये आर्दिट मुरजाच्या विरोधात रिंगमध्ये उतरला होता. दोघांमध्ये सामना सुरु झाला आणि काही वेळानंतर मुरजाच्या उजवा जॅब लगावला. बोरिस आपल्या बाजूूच्या कोपऱ्यात मागे झाला आणि रोपवर जाऊन अदळला. त्यानंतर तो थंडच पडला. मेडिकल स्टाफने त्याला शुद्धीत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतू त्यात त्यांना यश आले नाही. ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतू त्याचा त्यात मृत्यू झाला.