सुवर्णपदक विजेत्या माजी ‘बॉक्सर’ला ‘कोरोना’ची लागण, क्रीडाक्षेत्रात खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारताचा माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी 1998 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारे डिंको सिंग यांचा रविवारी अहवाल प्राप्त झाला. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी नुकताच दिल्लीहून मणिपूरचा प्रवास केला. दिल्लीहून निघताना त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ते तंदुरूस्त होते, मात्र मणिपूरला आल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत ते करोना पॉझिटिव्ह आढळले. डिंको सिंग सध्या कर्करोगाशी झुंजत आहेत.

निवृत्त बॉक्सर डिंको सिंग हे यकृताच्या कर्करोगाशी झुंजत आहेत. मार्च महिन्यात त्यांच्यावर दिल्लीत रेडिएशन थेरपीचे उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी बॉक्सिंग फेडरेशनच्या हवाई रूग्णवाहिकेने त्यांना दिल्लीला नेण्यात आले. पण लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यामुळे त्यांच्यावरील उपचारांची तारीख पुढे ढकलण्यात आली. वैद्यकीय उपचारानंतर ते मणिपूरला परतले. त्यावेळी त्यांना काविळ झाल्याचे निदान झाले होते. अशा स्थितीत त्यांना 2 हजार 400 किलोमीटरचा प्रवास करून मणिपूरला यावे लागले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉक्सिंग क्षेत्राात खळबळ उडाली आहे.