Boxer Miriam Gutierrez | महिला बॉक्सरला चेहऱ्यावर पडल्या चक्क 237 बुक्क्या, भयानक सूज आल्यानं बदलला पूर्ण चेहरा..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Boxer Miriam Gutierrez | पुरूषांसोबतच महिलांच्यादेखील बॉक्सिंगच्या स्पर्धा असतात. अलीकडेच एक बॉक्सिंगची मॅच (Boxing Match) झाली. मात्र यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. हि मॅच स्पेनिस बॉक्सर मेरियम गुटिएरस (Boxer Miriam Gutierrez) आणि अमंडा सरोना (Amanda Serrano) यांच्यामध्ये झाली.

 

 

मेरियम गुटिएरस  आणि अमंडा सरोना (Amanda Serrano) यांची मॅच चालू असताना, मेरियम गुटिएरसला भयंकर दुखापत झाली आहे. तिला बॉक्सिंग मॅच खेळत असताना अमंडाकडून थोड्या वेळातच 200 पेक्षा जास्त बुक्क्या मारल्या गेल्या आहेत. मात्र या बुक्क्यांमुळं तिला चक्क चेहऱ्यावर लागला असल्या कारणानं तिचा चेहरा प्रचंड सुजला आहे. त्यामुळे तिला ओळखनं अवघड झालं आहे.

 

 

या बॉक्सिंग मॅचनंतर मेरियम प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. तिनं तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे सुजलेला दिसत आहे. चेहराबरोबरच डोळे हात यावरही चांगलीच सुज आलेली दिसत आहे.

 

दरम्यान, या मॅचमध्ये अमंडा सरोनानं विजय मिळवला असून, तिनं 10व्या फेरीत तब्बल 237 बुक्क्या तिच्या चेहऱ्यावर मारल्यामुळं मेरियमच्या चेहऱ्याचा पूर्ण नकाशाच बदलला. मात्र मॅचनंतर तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले.

 

 

Web Title :- Boxer Miriam Gutierrez | boxer miriam gutierrez swelling face amanda serrano viral picture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा