‘प्रायव्हेट’ पार्टमध्ये ‘हवा’ भरल्यानं युवकाचा मृत्यू, CCTV त घटना ‘कैद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कारखान्यात कपडे बदलत असताना, चार जणांनी त्यांच्यातीलच एका १५ वर्षाच्या साथीदारास पकडले आणि त्याच्या मागील भागात एयर प्रेशरने पाईपद्वारे हवा भरली. मुलाने आरडाओरडा केला पण कोणीही त्याला वाचवायला आले नाही. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशमधील अलिगडची आहे.

अलिगडमधील हरदुआगंज शहरातील अहीर पाडा येथे राहणार्‍या मजुराच्या पाच मुलांपैकी दुसऱ्या नंबरचा १५ वर्षीय मुलगा ताला नगरी, सेक्टर १ मधील फॅक्टरीत गेल्या ३ महिन्यांपासून काम करत होता.

कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रोजच्या आपल्या वेळेप्रमाणे त्यांचा मुलगा काम संपवून आपले कपडे बदलत होता. त्याचवेळी, एक माणूस त्याच्या मागे गेला आणि एयर प्रेशर शरीराच्या मागील भागात लावला.

यानंतर, प्रेशर पाइपने मुलाच्या शरीराच्या मागील भागात हवा भरली. यावेळी, मुलाने आरडाओरडा केला परंतु त्याला वाचवण्याचे धाडस कुणी करू शकले नाही.

हवा भरल्याने मुलाच्या तब्येतीत बिघाड झाला. तेव्हा आरोपींनी वेळ साधत घटनास्थळावरून पळ काढला.

त्याच कुटुंबातील आणखी एक तरुण देखील या कारखान्यात कामाला आहे. त्याने पीडित मुलाला इतर सहकारी मजुरांच्या मदतीने खासगी रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला.

या घटनेची माहिती देताना एसपी ग्रामीण ने सांगितले की, हरदुआगंज पोलिस स्टेशन परिसरात डाई कास्टिंग मशीनच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाला. १५ वर्षाच्या मुलासोबत काम करणार्‍या ३ ते ४ इतर लोकांनी कॉम्प्रेसरने हवा भरली. हे सर्व घटना थट्टा करताना झाली की मग वेगळे काही कारण होते याची चौकशी केली जात आहे. हवा भरल्याने मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटूंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जो दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलाच्या मृत्यूनंतर घरात प्रचंड दुःखाचे वातावरण पसरले आहे. १६ दिवसांपूर्वीच मृताच्या बहिणीचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. ही झालेली अमानुष घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/