पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; बिल्डरविरोधात गुन्हा

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील भिलारेवाडी येथे मंगळवारी उघडकिस आली. याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या बिल्डरविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिल्लू उर्फ समर सुलतान शेख (वय ३ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर अनिल ज्ञानदेव खोपडे (वय ५०, भिलारेवाडी, कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुलतान युनूस शेख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा समर शेख हा खेळत असताना त्याला कोणीतरी शेजारी बांधकाम सुरु असलेल्या खोपडे यांच्या घराजवळ सोडले. त्यानंतर तो खेळत खेळत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ गेला. त्यावेळी तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने त्याचा तोल जाऊन तो त्यात पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बांधकाम सुरु असताना बांधकाम व्यावसायिक खोपडे यांनी बांधकाम साईटवर वॉचमन नेमलेला नाही. तसेच बेदरकारपणे पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे ठेवले. त्यामुळे समर याचा मृत्यू झाला. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like