धुळे : 4 वर्षीय मुलाचा शाॅक लागून मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने 4 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना साक्री रोड येथील कुमार नगरात रात्री साडेदहा वाजता घडली. लव्यम प्रशांत रेलन (वय 4 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शहारतील कुमार नगरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता गल्लीतील रस्त्यावर लहान मुले खेळत होती. खेळत असताना लव्यमचा हात विजेच्या खांबाला लागला. खांबात विज प्रवाह पोहोचल्यामुळे काही समजायच्या आतच लव्यमचा मृत्यू झाला. लव्यम हा शहरातील प्रसिद्ध उद्योजक महेन्द्र रेलन यांचा पुतण्या होता. घटनेची माहिती मिळताच पोलसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू केला.

काही वेळातच ही वार्ता कुमार नगरात वाऱ्यासाऱखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Visit : policenama.com

Loading...
You might also like