‘तो’ व्हिडिओ केंद्रीय गृहमंत्रापर्यंत…’त्या’ नराधमास अटक 

नवी दिल्ली : पाेलीसनामा ऑनलाईन

तरुणीला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा मुलगा तरुणीला बेदम मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. रोहित तोमर असं आरोपीचं  नाव असून या व्हिडिओचा वापर तो  दुसऱ्या एका तरुणीला घाबरवण्यासाठी  करत होता. अखेर त्याच्या या धमक्यांना त्रस्त होऊन त्या तरुणीने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. या व्हिडिओची दखल खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली असून त्यांनी या तरुणाच्या अटकेचे निर्देश  दिले आहेत.
[amazon_link asins=’B00VRV2MVG,B013T21X42′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2e03a1d-b820-11e8-8159-394253d23a30′]

आरोपी रोहित हा पोलिस उपनिरीक्षक अशोक तोमर यांचा  मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एका तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. तसंच हा मारहाणीचा व्हिडीओ दाखवून तुझीही अशीच अवस्था करेन अशी धमकी देत होता. अखेर वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली . दिल्ली पोलिसांनी आरोपी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०६ आणि ३५४ अनुसार गुन्हेगारी धाक दाखवणे , छेडछाडीचा गुन्हा, आणि अपमानास्पद वागणूक देण्यासाठी शिक्षा केल्याचा आरोप दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B00OWUDCC2,B0744L38KK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb7dbbc8-b820-11e8-9507-0f5ecfa846ea’]

ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता  दिल्लीतील उत्तमनगर परिसरातील एका बीपीओमध्ये घडली. सदर बीपीओ आरोपीच्या मालकीचा आहे. संतापजनक प्रकार म्हणजे आरोपीने या मारहाणीच्या व्हिडिओचे चित्रीकरण मित्राला करायला लावले होते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.