Viral Photo : 4 महिन्यांचा Pregnant आहे हा तरूण, म्हणाला – ’अतुरतेने पहातोय बाळाची वाट’

बोस्टन : तुम्ही कधी एखादा पुरूष प्रेग्नंट झाल्याचे ऐकले आहे का? तुमचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. परंतु आज आम्ही आपल्याला एक हैराण करणारी बातमी सांगणार आहोत. 18 वर्षाचा एक तरूण प्रेग्नंट झाला आहे आणि त्याच्या गर्भात 4 महिन्यांचे बाळ वाढत आहे. या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेवूयात…

हे आगळे-वेगळे प्रकरण ब्रिटनच्या बोस्टनमधून समोर आले आहे. बोस्टनमध्ये राहणारा 18 वर्षांचा मिके चनेल चार महिन्यांचा प्रेग्नंट आहे.

डॉक्टरांनुसार, मिकेच्या शरीरात फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. ज्यामुळे तो प्रेग्नंट झाला आहे.

मिकेच्या आईने सांगितले, जेव्हा मिके तिच्या गर्भात होता तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की, त्यांना मुलगी होईल, परंतु मुलगा जन्माला आहे. त्यास मुलाप्रमाणे वाढवण्यात आले, परंतु त्याला आतून काही तरी वेगळेच जाणवत होते. त्याला लहानपणापासूनच मुलींच्या वस्तूंमध्ये जास्त आवड होती.

मिकेने सांगितले की, तो लहानपणी मुलींच्या वस्तूंसोबत खेळत होता. त्याला लिपस्टिक लावणे आणि पर्स सोबत खेळण्यास आवडत होते. मिकेने पुढे सांगितले की, स्कूलमध्ये सुद्धा मला मुलं खुप त्रास द्यायची. कुणी मला गे म्हणत असे तर कुणी आणखी काही.

मिके चनेलने सांगितले की, मी नेहमीच पॅरेंट बनण्याचे स्वप्न पहात होतो जे आता पूर्ण होणार आहे. मी खुपच आनंदी आहे. मिकेने पुढे सांगितले, मी जागृकता पसरवण्यासाठी माझी सर्व हकीकत सोशल मीडियावर शेयर केली आहे.

मिके या बाळाची अतुरतेने वाट पहात आहे. मिकेने म्हटले की, मी एक-एक करून दिवस मोजत आहे, मला लवकरात लवकर माझ्या बाळाचं तोंड पहायचं आहे.