प्रेयसी घरात एकटी असल्याचे समजताच ‘त्यानं’ केला खून, पुढं जाऊन उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – कुरार येथील शिवशक्ती चाळीत राहणाऱ्या मंगेश नावाच्या तरुणाने आपल्या प्रियसीवर हल्ला करून स्वतः दहाव्या मजल्यावरून उडू मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर तरुणीची प्रकृती गंभीर आहे.

मालाडच्या कुरार भागात राहणाऱ्या मंगेशचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. मंगेशने या तरुणीला लग्नासाठी विचारले मात्र तरुणीने नकार दिला. याच रागामुळे तरुणी घरात एकटी आहे हे लक्षात घेऊन सोमवारी दुपारच्या सुमारास मंगेश थेट तिच्या घरात घुसला त्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला आणि याच वादातून चिडून मंगेशने चाकूने तरुणीवर हल्ला केला. तरुणीला रक्तभंबाळ अवस्थेत पाहून मंगेशनेही आपल्या हाताच्या नसा कापून घेतल्या आणि थेट इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारत आपला जीव गमावला.

इमारतीवरून कोणतरी पडल्याचे समजतात स्थानिकांनी ताबडतोब त्याला स्थनिक रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मंगेश नेमका कोठून पडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न ज्यावेळी केला तेव्हा दहाव्या मजल्यावर तरुणी रक्तभंबाळ अवस्थेत आढळून आली. तीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.

दोघांमध्ये नेमका काय वाद झाला ? आणि मंगेशने आत्महत्या का केली या सगळ्यांची उत्तरे या तरुणींकडून मिळणार आहेत मात्र पोलीस तिची प्रकृती ठीक झाल्यानंतर जबाब घेणार आहेत तेव्हाच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.

Visit : Policenama.com