असलेलं ‘झेंगाट’ फाटलं ! त्यानं चक्क WhatsApp स्टेटसला गर्लफ्रेन्डचा पुर्वी काढलेला ‘विवस्त्र’ फोटोच ठेवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने एक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करून व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

कुरार येथे राहणाऱ्या एका तरुणाचे त्याच्याच एका मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून मैत्रिणीने त्याला भेटण्यास टाळाटाळ करून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत तरुणाने तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने यापुढे आपल्याला प्रेमसंबंध ठेवता येणार नसल्याचे सांगत प्रेमप्रकरणाला नकार दिली. यामुळे संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला ठेवला.

काही दिवसांपूर्वी तरुण आणि तरुणी एकत्र आक्सा बीचवर फिरायला गेले होते. त्यावेळी त्याने मैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो काढला होता. याबाबत मैत्रिणीने तरुणाला जाब विचारला होता. तरूणाने तिला संबंध तोडल्यास हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तरुणाविरुद्ध फिर्याद दिली. तरुणीच्या फिर्यादेवरून चौकशी करून तरुणाला अटक केली आहे.

Visit : Policenama.com