17 वर्षाच्या मुलाने आईवर केला 118 वेळा चाकूने हल्ला, पोलिसांना फोन करुन म्हणाला….

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – 17 वर्षाच्या मुलाने त्याच्या आईवर 118 वेळा चाकूने हल्ला करून तिला ठार केले. घटनेनंतर मुलाने पोलिसांना फोनही केला आणि म्हणाला की, बॉडी बॅग घेऊन या. द सनच्या वृत्तानुसार, हा मुलगा एका खासगी शाळेत शिक्षण घेत होता.

118 वेळा चाकूने आईवर हल्ला करण्याची ही घटना इंग्लंडच्या हॅम्पशायरची आहे. मॉर्निंग वॉकनंतर घरी परत आल्यावर मुलगा रोवन थॉम्पसनने आई जोआना थॉम्पसनवर हल्ला केला. त्याचवेळी घटनेनंतर तीन महिन्यांपर्यंत कोठडीत असताना रोवनचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, 50 वर्षांच्या जोआनाचा प्रथमच गळा दाबून त्यांना बेशुद्ध केले. यानंतर त्यांच्यावर अनेक चाकूनी हल्ला करण्यात आला. ही घटना गेल्या वर्षी जुलैची आहे, परंतु या आठवड्यातील सुनावणीदरम्यान घटनेशी संबंधित माहिती सार्वजनिक झाली आहे.

सुनावणीदरम्यान असेही समजले आहे की, रोवन वेगळ्या ठिकाणी वडिलांसोबत राहून आईला भेटायला आला होता. आईच्या हत्येनंतर जेव्हा त्याने पोलिसांना फोन केला तेव्हा रोवन पूर्णपणे शांत झाला आणि सामान्य आवाजात त्याने माहिती दिली की- ‘मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर तिच्यावर चाकूनी हल्ला केला.’

रोवनला अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा मुलगा पूर्णपणे शांत झाला होता. तपासादरम्यान हेही उघडकीस आले की, रोवनला मानसिक समस्येमुळे प्रथम मानसिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले गेले होते आणि घटनेच्या आदल्या रात्रीच त्याचा आईशी वाद झाला होता.