Video : ‘त्यानं’ हॉस्पीटलमध्ये गायलं ‘अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना’, युवकाच्या मृत्यूनंतर गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एका युवकाने रुग्णालयातील बेडवर बसून ‘अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना…’ गाणे गायले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. मात्र, व्हिडिओ पाहायला तो युवक जगामध्ये राहिला नाही. ऋषभ दत्ता असे या युवकांच नाव आहे.

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपोथर हे ऋषभचे गाव. दोन वर्षांपूर्वी त्याला अप्लास्टिक अँनिमिया हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले होते. अनेक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, तो बरा झाला नाही. उपचारादरम्यान त्याचा नऊ जुलै रोजी मृत्यू झाला. पण, त्याच्या आवाजातील व्हिडीओ सोशल मीडियावरती पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

https://www.facebook.com/watch/?v=2949418961822582

गेल्या वर्षी ऋषभच्या आवाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आवाज ऐकून अनेकजण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. तसेच, सोशल मीडियावर तो चर्चेत सुद्धा आला होता. पण, आजराने शेवटपर्यंत त्याची पाठ सोडली नाही. त्यानेही शेवट पर्यंत गाण्याचा आनंद लुटला. ‘अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना…’हे त्याचे शेवटचे गाणे ठरले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ रुग्णालयात एका बेडवर बसून हातात गिटार घेऊन गाणे गात आहे. त्यावेळी त्याचा आवाज ऐकण्यासाठी बाजूला नर्स आणि आरोग्य कर्मचारीही दिसत आहेत.

ऋषभचा ‘अच्छा चलता हूं, दुआओं मे याद रखना…’ हे शेवटचे गाणे ऐकून अनेकजण भावुक होत आहेत. शिवाय, प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like