चीनची भारताला धमकी, ‘ड्रॅगन’ म्हणाला – ‘आमचं काही नाही बिघडवू शकत तुम्ही, हा 7 हजार कोटींचा व्यापार’

बिजिंग : वृत्तसंस्था – भारत – चीन सीमेवर मोठा तणाव असताना भारतातील काही संघटना चीनी वस्तूंना विरोध करत आहेत आणि बहिष्कार टाकण्यासाठी कॅम्पेन चालवत आहेत. तिकडे चीनने सुद्धा भारतातील त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चीनने म्हटले आहे की, भारतातील काही अती-राष्ट्रवादी आमच्या वस्तूंविरोधात अफवा पसरवत आहेत, परंतु त्यावर बहिष्कार टाकणे इतके सोपे नाही. आमच्या वस्तू भारतीय जीवनाच्या महत्वाचा भाग बनल्या आहेत आणि हा आता 7 हजार करोडपेक्षा जास्त व्यापार आहे.

चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार चीनने म्हटले की, भारतातील काही अती-राष्ट्रवादी पक्ष सतत चीनला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. हे पहिल्यांदा होत नाही की, चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी कॅम्पेन चालवले जात आहे, परंतु आम्ही भारताला समजावू इच्छितो की, हा तोट्याचा सौदा आहे आणि ते शक्य सुद्धा नाही. चीनने बॉलीवुड फिल्म 3 इडियट फेम शास्त्रज्ञ सोनम वांगचुक याने जारी केलेला व्हिडिओ आणि रिमूव्ह चायनीज अ‍ॅप नावाच्या अ‍ॅप्लिकेशनवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, हे अ‍ॅप्लिकेशन चीनच्या आक्षेपानंतर गुगल स्टोरवरून हटवण्यात आले आहे. चीनने बनवलेले सर्व अ‍ॅप्लिकेशन सीलेक्ट करून स्मार्टफोनमधून डिलीट करण्यासाठी हे अ‍ॅप बनवण्यात आले होते, असा दावा केला जात आहे.

चीनला बदनाम केले जातेय
ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध लेखानुसार, भारत-चीनच्या दरम्यान सीमावाद काही नवीन नाही आणि इतका गंभीर नाही, जितका भारतातील काही विशिष्ट विचारधारेचे लोक वाढवून-चढवून सांगत आहेत. दोन्ही सरकार सतत चर्चा करत आहेत आणि भारतीय सरकारची भूमिका सकारात्मक आहे. चीनने भारतीय मीडियाला काही अति-राष्ट्रवादी नेत्यांना स्थिती वाढवून-चढवून सादर करण्यासाठी दोषी ठरवले आहे. चीनने आरोप केला आहे की, त्यांच्याबाबत सतत भ्रामक माहिती पसरवली जात आहे. शांघाय इन्टिट्यूट ऑफ इन्टरनॅशनल स्टडीजचे रिसर्च फेलो झाओ गनचेंग यांच्यानुसार भारतात चीन विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. मागच्या वर्षी दोन्ही देशांमध्ये 7 हजारो करोडचा व्यापार झाला आहे. आणि यामध्ये जास्त आयात भारताने केली आहे.

चीन सतत म्हणत आहे की, कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे, अशात चीनी वस्तूंना विरोध करून भारत मध्यमवर्गावरील ओझे वाढवणार आहे. कारण भारतात जास्तीत जास्त स्वस्त वस्तू चीनकडूनच आयात केल्या जातात. इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्परेरी इन्टरनॅशनल रिलेशनच्या साऊथ आशियाचे डेप्युटी डायरेक्टर लोउ चुन्हाऊ यांच्यानुसार भारतीयांसाठी सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे शक्य नाही.

ते म्हणाले, मोदी सरकारला भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा उभे करायचे आहे. जे भारताच्या सध्याच्या जीडीपीच्या केवळ 16 टक्के आहे. परंतु चीनी वस्तूंवर बहिष्कार शक्य नाही, सध्यातर अजिबात नाही. भारतीय स्मार्टफोन मार्केटचा 72% भाग चीनी कंपन्यांच्या ताब्यात आहे. टीव्हीच्या बाबतीत ही भागीदार 45% आहे. तर रोजच्या वस्तूंसाठी ही भागीदारी 70 ते 80 टक्केपर्यंत जाऊ शकते.