मोरदड तांडा गावाचा मतदानावर बहिष्कार ; पाण्याचा टँकर सुरु करण्याची मागणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात कोरडा दुष्काळामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. याबाबतीत वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाकडून दाद मिळत नाही. त्यामुळे येथिल मोरदड तांडा गावातील वृद्ध मंडळींनी जिल्हाधिकारी कर्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. तसेच गावात पाणी योजना व टॅंकर सुरू न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गावातील जलाशयात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे, गावातील काही विहिरी कोरड्या झाल्या आहेत, शेतातील पिकाला द्यायला पाणी नाही, गुरांना पाणी नाही, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते तेही जादा दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाझर तलावही अटले यामुळे टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ ञस्त झाले आहेत. महिलांना दुरवर शेतातील विहिरीला तासतास पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. गावात पाणी समस्येमुळे सगळेच जण ञस्त झाले आहे.

शासनाने गावात पाण्याचा टँकर सुरु करावा, विहिर अधिग्रण करावी, पाणी मिळावे यासाठी पाईप लाईन योजना मंजुर करावी. या बाबीकडे कोणी अगोदरही लक्ष दिले नाही व अता देखिल जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊनसुध्दा काही दाद मिळत नसल्याचे लक्षात येताच शुक्रवारी तालुक्यातील मोरदड तांडा येथील गावातील वृध्द मंडळीनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील क्युमाईन क्लब मैदानाजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे. शासनाचा निषेध करत गावात पाणी योजना व टँकर सुरु न केल्यास ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार असा इशारा दिला आहे.

यावेळी सरपंच बद्रीनाथ पवार, हरी राठोड, हरिचंद्र पवार, सखाराम चव्हाण, नरहर पवार, नवलसिंग पवार, जगन चव्हाण आदी सहभागी झाले होते.