BoyCott करण जोहर & सलमान खान फिल्म्स, Online याचिका दाखल करत सुशांतच्या चाहत्यांनी राबवली ‘सह्यांची’ मोहिम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही. त्याच्या आत्महत्येनंतर आता अनेक वेगवेगळे तर्क लावले जात आहे. डिप्रेशन, गटबाजी, नेपोटीजम अशा अनेक गोष्टींमुळं त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म्स, समलान खान आणि संजय लीला भन्साळी अशा काही मोठ्या मीडिया हाऊसनं त्याला बॅन केल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या नंतर आता सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात ऑनलाईन याचिका दाखल केली असून यासाठी सह्यांची मोहिम राबवली जाताना दिसत आहे. याला आता प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष बाब अशी की, एक मिलियनहून अधिक लोकांनी या याचिकेवर सही केली आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर बॉलिवूडमधील अनेक मुद्दे तापताना दिसत आहेत.