#BoycottBingo : रणवीर सिंगमुळं नवा वाद ! SSR ची खिल्ली उडवल्याचा होतोय आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या सोशलवर सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या चाहत्यांकडून एक हॅशटॅग चालवला जात आहे जो ट्रेंड करताना दिसत आहे. #BoycottBingo असा हा हॅशटॅग आहे. याचं कारण आहे ते म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) ची नवीन जाहिरात. रणवीरची ही जाहिरात पाहून चाहते नाराज झाले आहेत. ही जाहिरात सुशांतच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बिंगोची जाहिरात रणवीरसाठी ठरली अडचण

जाहिरातीत दिसत आहे की, रणवीरच्या घरी काही पाहुणे आले आहेत. रणवीर बिंगो खात आहे. ते पाहुणे रणवीरला पुढील प्लॅन विचारत आहेत. परंतु परेशान होत असं काही उत्तर देतो की, सर्वांची बोलती बंद होते. यावेळी तो मार्स, फँटम, एलियन अशा शब्दांचा वापर करताना दिसत आहे. हे ऐकून समोरच्यांचं डोकं चकरावून जातं.

जाहिरात बॅन करण्याची सुशांतच्या चाहत्यांची मागणी

ही जाहिरात पाहिल्यानंतर चाहत्यांना असं वाटत आहे की, यात सुशांतची खिल्ली उडवली गेली आहे. ते आता याला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.

नेमकी अडचण कुठंय ?

सुशांतला स्पेस आणि सायंसमध्ये खूप रस होता. या जाहिरातीलाही त्याच अँगलनं पाहिलं जात आहे. तसं तर जाहिरातीत कुठेही सुशांतचं नाव घेतलं गेलेलं नाही.

बिंगोनं हेट मेसेजपासून वाचण्यासाठी केलं असं काही

हा विरोध पाहता बिंगोनं त्यांच्या यूट्यूबवर अपलोड केलेल्या या व्हिडिओसाठी लाईक आणि कमेंट सेक्शन बंद केलं आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की, सोशलवर ट्रेंड करणाऱ्या या हॅशटॅगवर रणवीर सिंग काय उत्तर देतो.

You might also like