वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडकडून बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने बोलवून तरुणीच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बॉयफ्रेंडच्या घरी नेले. त्यानंतर त्या बॉयफ्रेंडने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडवर गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत तरुणी मुंबईच्या कांदिवली परिसरात राहण्यास आहे. तिची मैत्रिण नायगाव परिसरात राहते. बुधवारी पिडीतेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मैत्रिणीने सायंकाळी तिला बोलवले. त्यानंतर सायंकाळी त्या स्टेशनजवळ भेटल्या. तेथेच जवळ असलेल्या एका बारमध्ये त्या गेल्या. तेथे वाईनमध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला देण्यात आले. नशा केल्यामुळे आराम करण्यासाठी म्हणून ती पिडीतेला घेऊन तिचा बॉयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली. घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद करतगुंगीत असलेल्या पिडीतेवर त्याने बलात्कार केला.

त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र पिडीतेने या सर्व प्रकाराची हकिकत वालीव पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या फिर्यादीनुसार तिच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड व मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.