बॉयफ्रेंड रोहमन शॉलने खुलेआम केलं सुष्मिता सेनला ‘KISS’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सुष्मिता सेन सध्या आर्मेनियामध्ये हॉलिडे एन्जॉय करत असून ती आपल्या मुलगी आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत आहे. हॉलिडे एन्जॉय करतानाच सुष्मिता अनेक तिचे फोटो सोशलवर शेअर करत आहे. या फोटोत दिसत आहे की, सुष्मिता किती खुश आहे. या फोटोत पूर्ण कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोंपैकी रोहमन आणि सुष्मिताच्या एका फोटोची सोशलवर खूप चर्चा सुरु आहे. या फोटोत दोघे किस करताना दिसत आहे. नुकताच हा फोटो समोर आला आहे. हा फोटो खूपच रोमँटीक आहे.

रोहमनने हा फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. काही तासांनंतर सुष्मितानेही हा फोटो आपल्या वॉलवरून शेअर केला आहे. म्हणजेच दोघांनीही एकसारखाच फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसत आहे की, रोहमन सुष्मिता किस करत आहे. निरखून पाहिलं तर दिसेल की, रोहमन सुष्मिताच्या गालावरील खळीला किस करत आहे. यावेळी सु्ष्मिताही खूप स्माईल करत आहे. रोहमनने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला हिची खळी खूपच आवडते. माय मंचकीन. सुष्मिता आय लव्ह यू. #love #life #happiness #smile #mine.”

दुसरीकडे सुष्मिताने जो फोटो इंस्टग्रामवर शेअर केला आहे त्याच्या कॅप्शनमध्ये सुष्मिता म्हणते की, “नेहमीच स्माईल करण्याचं इथे आणखी एक कारण आहे. आय लव्ह यू रोहमन.” याआधीही सुष्मिताने रोहमनसोबत अनेक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची खूप चांगली बाँडिंग दिसली आहे. पोस्टमध्ये दोघांनीही खुलून आपले प्रेम व्यक्त केले आहे. दोघांनीही या नात्याला जाहीरपणे स्विकार केलं आहे सोबतच हे फोटोही शेअर केले आहेत. .

 

आरोग्यविषयक वृत्त