बॉयफ्रेन्ड म्हणाला NO, 136 KG वजन असलेल्या महिलेनं केलं असं काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका मुलीने एक अजब प्रकार केला आहे. त्या महिलेने बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तब्बल १३६ किलो वजनावरून थेट ६३ किलो वजन उतरवलं आहे. जोसी असं त्या मुलीचं नाव आहे. जोसीचं वय केवळ २९ वर्ष असून तर तीच इतक्या कमी वयात १३६ किलोग्रॅम वजन होतं.

जोसीने आपल्या बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तिने चक्क वजन कमी करण्याची कृती केली आहे. तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्याशी ब्रेकअप केला होता. तिचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं वजन हे त्यामागचं कारण होतं. त्यानंतर २०१८ रोजी जोसीने तीच वजन कमी करायला सुरवात केली. त्यांनतर तिने ३ वर्षात ६३ किलो वजन उतरवलं आहे.

तर जोसीने वैयक्तिक ट्रेनरच्या मदतीनं वजन कमी करण्यात यश मिळवलं आहे. ७३ किलो वजन झाल्यावर तिने पहिल्यांदा बिकिनी घातली. असं तिने सांगितलं आहे. पुढे ती म्हणते की, मी अशी मुलगी होते जिला वाढलेल्या वजनामुळं तिचा बॉयफ्रेंड पसंत करत नव्हता. परंतु आता ती अशी मुलगी झाली आहे जिला तो इच्छा असूनही मिळवू शकणार नाही.’ जोसी आणि तिच्या वेट लॉसची कथा समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे.