खळबळजनक ! ‘सेक्स’ला नकार दिल्याने प्रेयसीवर ‘अ‍ॅसिड’ हल्ला

शाहजहानपूर : वृत्तसंस्था – सेक्सला नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने चक्क प्रेयसीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर येथे समोर आली आहे. यात प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

नसीमउल्ला (वय ५०) याने आपल्या ४५ वर्षीय प्रेयसीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तिलहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला आणि नसीमउल्ला याच्याशी मागील ५ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. दरम्यान दोघांमध्ये शुक्रवारी सेक्स झाला. त्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. या भांडणानंतर त्याने पुन्हा तिच्याकडे सेक्सची मागणी केली. त्यानंतर तिने नकार दिला. मात्र या प्रकाराने तो चिडला. त्यानंतर त्याने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. यात तिच्या कमरेखालचा भाग भाजला. त्यानंतर तिला तसेच टाकून तो पळाला. तिने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी धावत आले. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.