Video : संतापजनक ! मुलीला पळवलं अन् लग्न केलं म्हणून मुलाच्या वडिलांना झाडला बांधून बेदम मारहाण, महाराष्ट्रातील घटना

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरुन चक्क मुलाच्या वडिलांना भर चौकात झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळाल्याने माहितीनुसार, एका तरुणाने भाळवणी गावात राहणाऱ्या मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेऊन लग्न केले. तोच राग मनात धरुन मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या घरावर हल्ला चढवला. तसेच संतप्त कुटूंबातील नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून तीन कि. मी अंतरावरुन दोरीने बांधून गावाच्या चौकापर्यंत मारहाण करत नेले. व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून मारहाण केली.

Advt.

दरम्यान, घडलेल्या घटनेमळे एकच गोंधळ उडाला असून, चौकात गावकऱ्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारुन एकच गर्दी केली. गावातील लोकांनी ताबडतोब पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी जात मारहाण करणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.