‘बॉईज लॉकर रूम’नंतर ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट व्हायरल, कारवाई करण्याची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – ‘बॉईज लॉकर रूम’ नंतर आता कथित ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर बरेच लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. ट्विटरवर #girlslockeroom ट्रेंड करत आहे.

इंस्टाग्राम चॅट ग्रुप ज्याला ‘बॉईज लॉकर रूम’ म्हटले जात होते, त्यात दिल्ली पोलिसांनी गँगरेपचा कट रचण्याची चर्चा केल्याबद्दल कठोर कारवाई केली होती आणि आरोपी मुलाला अटक देखील केले होते. अशा परिस्थितीत आता ट्विटरवर ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट समोर आल्यानंतर लोक अशा मुलींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

‘गर्ल्स लॉकर रूम’चे जे कथित चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यात मुली मुलांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अश्लील संवाद आणि वक्तव्य करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर असा आरोप केला जात आहे की हा ग्रुप चॅट काही महिलांकडून केवळ मुलींसाठी संचलित केला जातो. या ‘गर्ल्स लॉकर रूम’ मध्ये पुरुषांबद्दल अपमानजनक चर्चा केल्या जातात.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर चॅट ग्रुपचे काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत, ज्यात मुली पुरुषांबद्दल अश्लील गोष्टी बोलत होत्या. महिलांच्या ग्रुप चॅट स्क्रीनशॉटमध्ये फक्त पुरुषांचे आक्षेपार्ह फोटो आहेत.