रिसर्च ! ‘ते’ पुरुष शारीरिक संबंधाबाबत अधिक आक्रमक !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नेहमी पार्टीमध्ये जाणारे तरुण किंवा पुरुष मद्यसेवनासाठी बारमध्ये जातात. बारमध्ये जाणारे पुरुष सेक्शुअली खुप अग्रेसिव्ह असतात.  असा एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, जे पुरुष बारमध्ये जातात. मद्यसेवन करतात. या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याने ते शारीरिक संबधांदरम्यान आक्रमक पद्धती वापरतात, असे अनेकदा दिसून आले.

एक सर्वे ऑनलाईन आयोजित करण्यात आला, यामध्ये १ हजारांपेक्षा अधिक कॉलेजला जाणाऱ्या तरुणांचा जास्त सहभाग आहे. या तरुणांना अभ्यासकांनी काही प्रश्न विचारली की, मद्यसेवन किती दिवसाच्या अंतराने करतात ? किती वेळा ते बारमध्ये जातात ? किंवा पार्टी करतात ? क्लीवलॅंड यांच्या सर्वेमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांना हेही विचारले की, एखाद्या महिलेला शारिरीक संबधासाठी तयार करण्यासाठी ते कोणत्या पद्धतीचा वापर करतात किंवा त्यांच्यावर कोणता दबाव टाकतात.

अभ्यासकानूसार, या पद्धतीमध्ये ब्रेकअपची धमकी देण्यापासून ते महिला पार्टनरला जबरदस्ती मद्यसेवन करायला लावणे आणि शारीरिक त्रास देणे या पद्धतीचा समावेश आहे. हा रिसर्च एका वृत्तामध्ये प्रकाशित करण्यात आला. यातून समोर आले की, जे लोक नेहमी पार्ट्यांमध्ये किंवा बारमध्ये जातात. त्यांच्यात शारीरिक संबधांबाबत अधिक आक्रमकता बघायला मिळाली. त्यांचे एकापेक्षा अधिक पार्टनर होते. आणि ते कोणत्याही कमिटमेंटशिवाय शारीरिक संबंधाला प्राथमिकता देत होते.

वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक मायकल क्लीवलॅंड म्हणाले की, ‘आम्हाला रिसर्चमधून आढळले की, शारीरिक संबंधात आक्रमकता केवळ मद्यसेवनेमुळे नाही तर सोबतच त्या वातावरणामुळेही होती, जिथे मद्यसेवन केले जाते, या दोन्ही गोष्टी अकत्र आल्या की शारीरिक संबंधादरम्यान आक्रामक पद्धती वापरल्या गेल्याची प्रकरणे सर्वात जास्त पहायला मिळतात.’

Loading...
You might also like