BP Control Tips | उन्हाळ्यात ‘ब्लड प्रेशर’ वाढणे ठरू शकते धोकायदायक, ‘या’ 5 ड्रिंक्सने करा बीपी कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) किंवा हायपरटेन्शन (Hypertension) हा एक आजार आहे, जो खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, तणाव आणि धूम्रपानामुळे (Bad Lifestyle, Eating Habits, Stress And Smoking) विकसित होतो. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या (Blood Vessel) भिंतींवर जास्त ताण येतो तेव्हा हाय ब्लड प्रेशरची समस्या (High Blood Pressure Problem) उद्भवते. रक्तवाहिन्यांवरील दाबामुळे रक्तदाबाची पातळी वाढते. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 mmHg असतो, परंतु हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक, किडनी फेल आणि स्ट्रोक (Heart Attack, Kidney Failure And Stroke) होऊ शकतो (BP Control Tips).

 

जेव्हा जेव्हा रक्तदाब 140/90 mmHg च्या वर असतो तेव्हा त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना उन्हाळ्यात जास्त त्रास होतो. उष्णतेमुळे त्यांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे बीपी नियंत्रणात (BP Control) ठेवणे गरजेचे आहे. बीपी नियंत्रित करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवणारे हेल्दी ड्रिंक्स बीपीच्या रुग्णांच्या आहारात समाविष्ट करा. रक्तदाब नियंत्रित करणार्‍या पाच पेयांविषयी जाणून घेवूयात (BP Control Tips)…

 

1. नारळ पाणी प्या (Drink Coconut Water) :
बीपीचे रुग्ण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळपाणी प्यावे. लो-कॅलरी (Low-calorie) असलेल्या नारळाच्या पाण्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल (Fat And Cholesterol) नसते, त्यामुळे बीपीच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पेय आहे.

 

2. बीट ज्यूस प्या (Drink Beetroot Juice) :
लो-कॅलरी बीट ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि क्लोरीन (Minerals, Carbohydrates, vitamins And Chlorine) भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध बीटचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

3. टोमॅटोचा ज्यूस ठेवेल रक्तदाब नियंत्रणात (Tomato Juice Will Keep Blood Pressure Under Control) :
टोमॅटोचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते, जे बीपी नियंत्रित करते. टोमॅटोचा रस एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतो.

 

4. संत्र्याचा ज्यूस प्या (Drink Orange Juice) :
उन्हाळ्यात संत्र्याचा ज्यूस इम्युनिटी मजबूत करतो तसेच बीपी नियंत्रित करतो.
संत्र्याच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम, फोलेट आणि नैसर्गिक आंबट बायोफ्लेव्होनॉईड्स (Potassium, Folate And Natural Sour Bioflavonoids)
भरपूर प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी असते.

 

5. डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice) :
लाल रंगाचे डाळिंब दिसायला जेवढे सुंदर दिसते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियमने समृद्ध असलेल्या डाळिंबाचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- BP Control Tips | summer drinks that can control high blood pressure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin-D Overdose Signs | गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन-डी खाल्ल्याने काय होते? कशी असतात याची लक्षणे?

 

Curd Benefits in Summer | उन्हाळ्यात रोज खा दही, आरोग्याला होतील ‘हे’ 4 फायदे

 

Special Breakfast | नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी बनवा चविष्ठ फ्रेंच टोस्ट, मिळेल भरपूर प्रोटीन