एकेकाळी दुबईमधील घराघरात जाऊन ‘तो’ भारतीय विकायचा औषध, आता करणार भारतात 35 हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि तुमच्यात काम करण्याची जिद्द असेल तर कितीही संकट आली तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील बी. आर. शेट्टी. शेट्टी हे भारतातून दुबईला फक्त नोकरी करण्यासाठी गेले होते. मात्र आता शेट्टी हे दुबईतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येतात.

बी. आर. शेट्टी आता भारतामध्ये हेल्थ केअर सेक्टरमध्ये करोडो रुपये गुंतवणूक करणार आहेत. शेट्टी हे जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचा भाग राहिलेले आहेत. ते भारतात ५ बिलियन डॉलर म्हणजेच ३५ हजार कोटी गुंतवणूक करणार आहेत.
B-R-Shetty
भारतात गुंतवणुकीसाठी शेट्टी तयार –
शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी ३५ हजार कोटी गुंतवणुकीसाठी भारतात विचारणा केली आहे. त्यासंबंधी त्यांना राज्य सरकार, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तसेच धार्मिक संघटनांकडून चांगल्या ऑफर मिळत आहेत. त्यातून ते भारतामध्ये उच्च दर्जाचे काम करणार आहेत. आता त्यांचे ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ आरोग्य क्षेत्रात विकास करण्याबाबत योजना बनवत आहे. ते म्हणतात की यामुळे भारतात हेल्थ केअरचे एक क्षेत्र बनणार आहे म्हणून ही गुंतवणूक केली जात आहे.

यासाठी दिल्ली, हरिद्वार, बिहार, वाराणसीमध्ये हॉस्पिटल बनवण्याची बोलणी सुरु आहे. याबाबत जमीन खरेदी केली जाईल किंवा सरकारच्या मदतीने मिळवली जाईल. त्यांनी सांगितले की, ७० खाटांची क्षमता असलेल्या हॉस्पिटलला २०० खाटांचे उत्तम एसी हॉस्पिटल केले जाणार आहे आणि इथे उपचार एकदम फ्रीमध्ये केली जाईल.

कोण आहेत बी. आर. शेट्टी
शेट्टी यांचा जन्म १९४२मध्ये कर्नाटक येथे झाला आणि तेथेच त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. १९७३ मध्ये शेट्टी काही रक्कम घेऊन दुबईला गेले. विदेशात ते नोकरीच्या शोधासाठी गेले होते. मात्र त्यांना बरेच दिवस बेरोजगारीला सामोरे जावे लागले.
B-R-Shetty
घरोघरी जाऊन विकली औषधे 
नोकरी न मिळाल्यामुळे शेट्टी नाराज झाले नाहीत तर त्यांनी घरोघरी जाऊन औषधे विकायला सुरुवात केली आणि ते सेल्समनचे काम चांगल्या पद्धतीने करू लागले. या बाबतची माहिती त्यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. शेट्टी सांगतात की या सेल्समनच्या कामामुळे त्यांचे दुबईतील मोठ्या मोठ्या डॉक्टरांसोबत ओळखी झाल्या होत्या.

शेट्टी यांनी UAE मध्ये प्रायवेट NMC Healthcare नामक कंपनीची स्थापना केली होती. मागील ४६ वर्षांपासून या कंपनीने २०० हेल्थकेअरचा आकडा पार केला आहे. ज्यामध्ये १७ देशांमध्ये हॉस्पिटल, मेडिकल सेंटर्स, लॉन्ग टर्म केयर फॅसिलिटीज, डे सर्जरी सेंटर्स, फर्टिलिटी क्लिनिक्स आणि होम हेल्थ सर्विसचा समावेश आहे.
B-R-Shetty
१९८० मध्ये यूएई एक्सचेंज बनवली 
शेट्टींच्या लक्षात आले की, भारतीय आपल्या घरी पैसे पाठवण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळेस त्यांनी यूएई एक्सचेंजची स्थापना केली. आता ही कंपनी खूप मोठी झाली आहे. २०१४ मध्ये त्यांनी ट्रॅवेक्स नावाची कंपनी विकत घेतली जिच्या २७ देशांमध्ये शाखा आहेत.

परदेशात असूनही शेट्टी यांनी हिंदू धर्मासाठी खूप काम केलं आहे. शेट्टी हे अबुदाबी मध्ये होणाऱ्या हिंदू मंदिराच्या समितीचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ला अमिरातच दौरा केला होता. त्यावेळी अबुदाबी सरकारने मंदिरासाठी जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. मंदिर निर्माण कार्याची जबाबदारी शेट्टीच्या खांद्यावरच आहे. एवढेच नाही तर हजारो भारतीयांनी मागील वर्षी अमिरातमध्ये मोदींचे स्वागत केले होते. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे बी. आर. शेट्टीच होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like