ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका मीरा वाडकर यांना पुरस्कार जाहीर

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – समाजात उल्लेखनीय कामगिरी केली अशा व्यक्तींना इंडिया स्टार कडून पुरस्कार प्रदान केले जाते. यंदाच्या दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी सोनपेठ येथील ब्रह्मकुमारी केंद्र संचालिका मिरा वाडकर यांना घोषित झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती मीरा वाडकर यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून ब्रह्माकुमारी केंद्राच्या माध्यमातून विविध उल्लेखनीय सामाजिक कामे यशस्वीरित्या पार पडली आहेत.

सध्याच्या चालू कोरोना काळात ब्रह्मकुमारी केंद्राच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना आवश्यक वस्तूंचे वितरण केले. या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा स्टार इंडियाने केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिक व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार पदक आणि प्रमाणपत्र स्वरूपात आहे. ऑगस्टच्या शेवटी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, हा पुरस्कार सर्व भारतीयांचा आहे. तणावमुक्ती, व्यसनमुक्ती, शाश्वत योगिक शेती, महिला सशक्तीकरण, नैतिक मूल्य जागरूकता या विषयावर त्यांनी आपले काम केले आहे. नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेच्या महिला तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य सर्वोत्तम आहे.