Brahman Mahasangh on Sharad Pawar | ‘शरद पवार खोटं बोलले; बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही’ – ब्राह्मण महासंघाने केला दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Brahman Mahasangh on Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सोबत शनिवारी सायंकाळी राज्यातील 12 संघटनांच्या 40 प्रतिनिधींची पुण्यामध्ये काही मुद्द्यांवरून बैठक झाली होती. या दरम्यान, बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही. शरद पवार यासंदर्भात जे सांगतायेत ते खोटं असल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे (Akhil Bhartiya Brahman Mahasangh) अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी केला आहे. (Brahman Mahasangh on Sharad Pawar)

 

शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत स्वत: पवार यांनीच या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना काही प्रतिनिधींनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती असे सांगितले होते. हे शक्य नाही असे सांगताना आपल्याकडील काही आकडेवारीची माहिती त्यांना दिली. त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यात या समाजाची संख्या अधिक दिसते. म्हणून आरक्षण मिळणे शक्य नाही, पण, ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ब्राह्मण समाजातील युवकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले असं पवार यांनीच बैठकीत म्हटले आहे.

दरम्यान, ”आरक्षणाचा विषयच बैठकीत झालेला नाही. यासंबधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध पसरले.
कोणालाच आरक्षण नको अशी काहीजणांची भूमिका होती, पण, पवार यांनी त्याचे खंडन करताना दलित,
आदिवासी तसेच मागास समाजाला त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण असायला हवे अशी भूमिका व्यक्त केली.
ब्राह्मण समाजाचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही, घटनेने दिलेले आरक्षण समाजाला मान्यच आहे.
त्या बैठकीत ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे असा मुद्दा कोणीच मांडलेला नसल्याचं,” ते म्हणाले.
त्याचबरोबर बैठकीला उपस्थित इतर 5 संघटनांनीही असा खुलासा केला असल्याचा,’ दावा कुलकर्णी यांनी केला असल्याचे म्हटले.

 

Web Title :- Sharad Pawar The issue of reservation did not come up in the meeting with Sharad Pawar – claimed Akhil Bhartiya Brahman Mahasangh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Water Supply Closed In Pune City | गुरूवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार; शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा

 

Bank Holidays June-2022 | जून महिन्यामध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा

 

Best Stocks to Buy | काही काळातच मोठा रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ 7 शेयरवर लावू शकता डाव, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला