विधानसभा 2019 : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ब्राम्हण महासंघाचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुक लढणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यांना पुणे ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केला आहे.

कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असे सांगितले असले तरी कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे. गरज पडल्यास ब्राम्हण महासंघाकडून उमेदवार सुद्धा उभा करण्याची घोषणा दवे यांनी यावेळी केली आहे.

शिवसेना करणार बंडखोरी –
कोथरूडमधील चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बंडखोरी करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याबाबत स्वतः मोकाटे यांनी घोषणा केली आहे.

कोथरूड हा भाजपचा मदतसंघ राहिलेला आहे. पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांना लोकसभेसाठी या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र आता भाजपला मतदार संघातूनच विरोध होऊ लागल्याने चंद्रकांत पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे. दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार,’ असं म्हणत आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील आपला सूर स्पष्ट केला आहे.

Visit : policenama.com