रणबीर कपूरची ‘प्रशंसा’ करताना ‘बिग बी’ अमिताभनं केलं मोठं विधान, शेअर केली ‘अंदर की बात’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन स्टारर ब्रह्मास्त्र हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अयान मुखर्जीनं डायरेक्ट केलेल्या या सिनमात चाहत्यांना जबरदस्त VFX पहायला मिळणार आहे. अलीकडेच बिग बींनी रणबीर कपूरबद्दल मोठं विधान केलं आहे ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. बिग बी अमिताभ यांना बॉलिवूडचे महानायक म्हटलं जात अशात त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बिग बी अमिताभ यांनी ब्रह्मास्त्रमधील सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत ज्यात रणबीर कपूरही दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये बिग बी म्हणाले, “माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक रणबीर. त्याच्या प्रतिभेला मॅच करण्यासाठी माझ्यासारखे 4 लागतील.” असं बिग बी म्हणाले आहेत. बिग बींची ही पोस्ट सोशलवर वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे.

ब्रह्मास्त्र सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर या सिनेमात अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. .त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा एक वेगळा अनुभव असणार आहे. हा सिनेमा तीन पार्टमध्ये असणार आहे. या सिनेमा आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. सिनेमाच्या निमित्तानं दोघांमधील जवळीकता वाढताना दिसत आहे.

You might also like