Brahmastra Box Office Collection Day 2 | जगभरात ‘ब्रह्मास्त्र’चा धमाका, 2 दिवसात कमाई 100 कोटींच्या पुढे, प्रेक्षकांनी बायकॉट धुडकावला!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Brahmastra Box Office Collection Day 2 | ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा उच्चांक गाठला. तर दुसर्‍या दिवशी ब्रह्मास्त्रची कमाई 100 कोटींच्या पुढे गेल्याने ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर (Brahmastra Box Office Collection Day 2) धमाका केल्याचे म्हटले जात आहे. ग्रॉस वर्ल्ड वाईड कलेक्शन 75 कोटी आणि दुसर्‍या दिवसाच्या कमाईने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिस गाजवत असल्याचे दिसत आहे.

 

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर, अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 36 कोटींचा गल्ला जमवला. दुसर्‍या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमका सुरूच ठेवला. ‘बॉलिवूड हंगामा’नुसार (Bollywood Hungama), ‘ब्रह्मास्त्र’ने दुसर्‍या दिवशी 41.25 ते 43.15 कोटी कमावले. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये 79 कोटींची कमाई केली. तर दुसर्‍या दिवशी सुमारे 20 टक्क्याची उसळी घेतली.

 

शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने 37.50कोटींचा व्यवसाय केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास 69.50 कोटींची कमाई केली आहे. आठवड्याअखेर ब्रह्मास्त्र 110 कोटींचा आकडा पार करू शकतो. नॉन हॉलिडेला प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी हा खूप मोठा आकडा आहे. तेलुगू व्हर्जनने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली. तमिळ व्हर्जनमध्ये 50 लाखांची जास्त कमाई झाली आहे.

ट्रोल गँगने ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला बायकॉट करण्याचे आवाहन सुरू केले होते.
यासाठी #BoycottBrahmastra हा हॅशटॅग ट्विटरवर चालवला होता.
परंतु बॉलिवुडच्या दृष्टीने पॉझिटिव्ह बाब म्हणजे हा बायकॉट प्रेक्षकांनी धुडकावत ‘ब्रह्मास्त्र’ला बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरवले आहे.
यामुळे ट्रोल गँगला खुप मोठी चपराक बसली आहे.

 

Web Title :- brahmastra box office collection day 2 film cross 100 cr know the details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा