धर्म आणि जातीयवादाचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचा निवडणुकीआधीच खेळला ब्राह्मण कार्ड 

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन 
काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए आहे, असे म्हणत सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावरही भाष्य केले.  सतत भाजपवर धर्म आणि जातीयवादाचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने स्वतःच आता आगामी निवडणुकांआधी ब्राह्मण कार्ड खेळतयाचेआहेत असल्याचे  समोर आले आहे.

[amazon_link asins=’B07BCGC13F,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8c1d1fb-b106-11e8-bd9c-d346f1f75610′]
याबाबत अधिक माहिती अशी की, हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाचे एक संमेलन आयोजित करण्यात आले होते, या संमेलनात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना आमंत्रित करण्यात आले होते, यादरम्यान रणदीप सुरजेवाला म्हंटले की, “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो, तिरंगा आणि काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासोबत ब्राह्मण संमेलनाचे आयोजन का केले जात आहे, अशी विचारणा माझ्या एका सहकाऱ्याने केली. मी सांगितले  की याचे उत्तर एक दिवस व्यासपीठावरुन देईल. काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राह्मण समाजाचा डीएनए आहे,”.
इतकेच नव्हे तर  आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाला केले. शिवाय हरियाणामध्ये सत्ता आल्यास ब्राह्मण विकास महामंडळाची स्थापना करु, असेही ते म्हणाले. सत्ता आल्यास ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन सुरजेवाला यांनी दिले.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने लिंगायत कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर आता हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत काँग्रेस पक्षातच ब्राह्मणांचा डीएनए असल्याचे म्हटले आहे.

जाहीरात