कोणत्या आवाजाला वेगाने प्रतिसाद देतो मेंदू ? ‘रिसर्च’मधील ‘हे’ 7 मुद्दे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्या आवाजातून राग किंवा धमकी दर्शवली जाते, त्या आवाजाला आपला मेंदू फार वेगाने प्रतिसाद देतो. जेणेकरुन संभावित धोक्यातून बचाव केला जाईल. सोशल, कॉग्निटीव्ह अ‍ॅन्ड इफेक्टीव न्यूरोसायन्स जर्नलमध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. आपलं लक्ष आपल्या आजूबाजूच्या आवाजांकडे वेगवेगळ्या प्रकारे किती वेगाने जातं आणि आपला मेंदू संभावित धोकादायक स्थितीत कसा बचाव करतो, हे जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला.

संशोधनातील महत्वाचे मुद्दे

1) डोळे कानाप्रमाणे आजूबाजूचे 360 डिग्री कव्हरेज घेऊ शकत नाही. त्यासाठी मान हलवावी लागते आणि इकडे-तिकडे बघावे लागते. त्या तुलनेत आवाज एका ठिकाणाहूनही ऐकू शकता आणि एकावेळी अनेक आवाज ऐकू शकता.

2) ऐकण्यादरम्यान धोकादायक स्थितीबाबत मेंदूची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी 22 मानवी आवाजांच्या लघुध्वनी तयार केल्या. काही आवाज सामान्य, काही राग व्यक्त करणारे आणि काही आनंदी होते.

3) दोन लाऊडस्पीकरांच्या माध्यमातून हे आवाज 35 लोकांना ऐकवण्यात आले. यावेळी इलेक्ट्रोइन्सेफलोग्रामच्या माध्यमातून मेंदूतील मिलीसेंकदपर्यंतच्या विद्युत हालचाली मोजल्या.

4) शास्त्रज्ञांनी ऑडिटरी अटेंशन प्रोसेसशी संबंधित इलेक्ट्रो फिजिओलॉजिकल मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले.

5) रागामध्ये संभावित धोक्याचा संकेत असू शकतो, याच कारणाने मेंदू फार जास्त वेळ याप्रकारच्या उत्तेजनेचं विश्लेषण करतो.

6) काही मिलीसेकंदात आपला मेंदू रागीट आवाजाबाबत संवेदनशील असतो.

7) कठिण परिस्थितींमध्ये संभावित म्हणजे येणार्‍या धोक्याच्या आवाजाचा स्त्रोत माहिती करणे गरजेचे आहे. कारण हे धोक्याच्या स्थितीत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या अस्तित्वासाठीही फार फायदेशीर आहे.