सावधान ! मेंदूत ‘जळजळ’ होत असल्यास ते गंभीर, ‘कोरोना’चं धक्कादायक लक्षणं आलं समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. य कालावधीत कोरोनाची विविध लक्षणे समोर आली आहेत. त्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईमधील मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात एक अशी घटना समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मेंदूत जळजळ झाली आणि तिने स्मरणशक्ती हरवली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण जर असा कोणताही त्रास तुम्हाला जाणवला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा, अन्यथा हे जीवावर बेतू शकतं.

या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या पालघरमधील 47 वर्षीय शाइस्ता पठाण कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दुर्मिळ असा एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूत जळजळ होणं ही समस्या दिसून आली होती. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंबंधित विकार पाहायला मिळतात. पण मागील काही दिवसांपासून विविध प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. यामध्ये गुलियन-बॅरी सिंड्रोम किंवा स्ट्रोक यांचा समावेश आहे. या महिलेला उपचारासाथी दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये जळजळ होत होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचार करत या महिलेचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाची लागण झाल्याने महिलेची स्मरणशक्ती हरवली असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.

या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले त्यावेळी यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतं होता. त्यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मात्र त्यांना दवाखान्यात प्रचंड त्रास सुरु झाला. वोक्हार्ट रूग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले. या महिलेच्या पोटाचा, छातीचा व मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला. या महिलेची अँण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली होती. रक्ताचा अहवालही सामान्य होता.त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूच्या एमआरआय रिपोर्टमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कोरोना चाचणी केल्यानंतर ती देखील पॉझिटिव्ह आली.