Brain Tumor Symptoms And Signs | सावधान ! ‘ही’ सामान्य लक्षणे मेंदूतील ट्यूमरचे लक्षण असू शकतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Brain Tumor Symptoms And Signs | ब्रेन ट्यूमरचा (Brain Tumor) आजार हा जीवघेणा आहे, यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका वाढू शकतो. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की सर्व प्राथमिक मज्जासंस्थेच्या गाठींपैकी ८५-९० टक्के ट्यूमर मेंदूमध्ये होतात. भारतातही ब्रेन ट्युमर ही मोठी समस्या आहे. २०१८ मध्ये, ब्रेन ट्यूमरचे देशात नोंदवलेल्या १० व्या क्रमांकाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणून वर्गीकरण केले गेले (Brain Tumor Symptoms And Signs).

 

तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी निदान होणार्‍या ब्रेन ट्यूमरची संख्या फारशी नसली, तरी त्यामुळे होणार्‍या मृत्यूचं प्रमाण (Brain Tumor Death Rate) आजही मोठ्या चिंतेचं कारण आहे. त्याची प्रारंभिक लक्षणे गंभीरपणे समजून घेतली पाहिजेत.

 

ब्रेन ट्युमर ही मेंदूतील असामान्य पेशींच्या अनियंत्रित वाढीची समस्या आहे. ट्यूमरच्या आकारानुसार आणि कोणत्या भागात आहे यावर अवलंबून, त्याची लक्षणे सौम्य किंवा तीव्र असू शकतात. त्याचे निदान व उपचार वेळेवर होणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, सुरुवातीच्या काही सामान्य लक्षणांचा विचार केला तर ही गंभीर आणि जीवघेणी समस्या वेळीच ओळखता येऊ शकते (Brain Tumor Symptoms And Signs).

 

मेंदूतील गाठींची समस्या (Brain Tumor Problem) –
मेंदूच्या ज्या भागात पेशी असामान्यपणे वाढतात त्याठिकाणी ब्रेन ट्युमर झाला असे मानतात. उदाहरणार्थ, जर मेंदूच्या सेरेबेलममध्ये ट्यूमर वाढत असेल तर रुग्णाला शारीरिक समन्वय निर्माण करण्यात, चालणे आणि सामान्य कामे करण्यात देखील अडचण येऊ शकते. गाठीचा आकार जसजसा वाढत जातो तसतशी त्याची लक्षणे तीव्र होत जातात. सर्वसाधारणपणे, सुरुवातीला विशिष्ट लक्षणे लक्षात आल्यास, वेळीच निदान करणे आणि त्यावर उपचार करणे सोपे होते.

ब्रेन ट्यूमरची चिन्हे ओळखा (Identify The Signs Of Brain Tumor) –
आरोग्य तज्ञांच्या मते, ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या अवस्थेत, लोकांना काही किरकोळ समस्या जाणवतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, काही काळ सतत अशा समस्या येत असतील, तर याबाबत तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळीच शोध घेतल्याने योग्य उपचार घेता येतो.

 

वारंवार डोकेदुखी (Frequent Headaches) –
ऐकण्याची किंवा दृष्टीची दुर्बलता.व्यक्तिमत्त्वात किंवा वर्तनात बदल.शरीराचा तोल सांभाळता न येणे. अनेकदा चक्कर येणे, अशक्तपणा किंवा शरीर सुन्न होणे. शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू होतो. अस्पष्ट कारणांमुळे उलट्या आणि मळमळ होण्याची समस्या.

 

ब्रेन ट्युमर का होतो (Why Does Brain Tumor Occur) ?-
दैनंदिन जीवनात काही विशिष्ट गोष्टी घडतात, त्याच्यामुळे तणाव वाढून ब्रेन ट्यूमर होऊ शकतो.
तसेच ज्यांच्या कुटुंबातील वडील, आजोबा किंवा आजी यांच्यापैकी कोणाला जर ब्रेन ट्यूमर झाला असेल
तर तो पुढील पिढीत संक्रमित होतो, असा काही आरोग्य तज्ज्ञांच्या अभ्यासात आढळून आले आहे.
याशिवाय रेडिएशनच्या (Radiation) संपर्कात अधिक काळ राहणार्‍या व्यक्तींनाही या आजाराचा धोका संभवतो.

ब्रेन ट्यूमर कसा बरा होतो (How Is Brain Tumor Cured) ?-
एका वैद्यकीय अहवालानुसार, ब्रेन ट्यूमरचा उपचार ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थान तसेच आपल्या एकूण आरोग्यावर अवलंबून असतो.
विशिष्ट प्रकारच्या औषधांपासून ते शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी (Surgery, Chemotherapy, Radiation Therapy) आणि इतर काही आवश्यक उपचारांचा वापर केला जातो.
या रोगाचे निदान लगेच झाल्यास आजारावर उपचार होऊन रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Brain Tumor Symptoms And Signs | brain tumor symptoms and signs in marathi know how to prevent it
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin-D Overdose Signs | गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन-डी खाल्ल्याने काय होते? कशी असतात याची लक्षणे?

 

Curd Benefits in Summer | उन्हाळ्यात रोज खा दही, आरोग्याला होतील ‘हे’ 4 फायदे

 

Special Breakfast | नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी बनवा चविष्ठ फ्रेंच टोस्ट, मिळेल भरपूर प्रोटीन