भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा समावेश असून देखील शिवसेनेने काही दिवसांपूर्वी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं होतं. त्यावरून भाजप आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवतानाच महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

सावरकर महान होते आणि आहेत. त्यांची बदनामी करणारी भोपाळची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने काँग्रेसला सुनावलं आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारं पुस्तक वाटप केल्याने एकच गदारोळ उठलेला असताना शिवसेनेनेही काँग्रेसला धारेवर धरले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सावरकर आमच्यासाठी महान होते, आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होाणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

सावकरांविषयी कोणीही आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. तरीही तुम्ही वारंवार का विचारता ? असा सवालही त्यांनी केला. सावरकरांबाबत जे लोक बरळत आहेत त्यांच्या डोक्यात घाण साचली आहे. त्यांचं डोकं तपासण्याची गरज आहे. सावरकरांबाबत संपूर्ण देशाला अभिमान आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले सावरकरांचे नातू
रणजीत सावरकर म्हणाले की सावरकरांची अशी बदनामी करणाऱ्याविरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी आणि या प्रकरणी फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल करावा. सावरकर यांचे नातू असलेले रणजीत सावरकर यांनी काँग्रेस सेवा दलाच्या या पुस्तकात दिलेल्या वादग्रस्त विधानाची निंदा केली. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की काँग्रेसची ही कहाणी बनली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/