पुणे : कारमध्ये सामान ठेवताना मुंबईकराचं चार लाखाचं ब्रेसलेट लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात आलेल्या मुंबईकरावर पुण्यात चोरट्यांनी डल्ला मारला असून, चोरीच्या पद्धतीने मुंबईकर अवाक झाले आहेत. शिवाजीनगर येथे त्यांचा एक मित्र कार घेऊन आला होता. कारमध्ये साहित्य ठेवत असताना चोरट्यांनी फिर्यादींनी हातात घातलेले तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचे मनगटी ब्रेसलेट नकळत चोरून नेले. त्यांच्या मित्राच्या लक्षात हा प्रकार लक्षात आला.

याप्रकरणी राजेश मेवावाला (वय.49, रा.लोअर परेल, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ड्राय फ्रुटचे व्यापारी असून ते मुंबईत व्यवसाय करतात. त्यांच्या मित्राच्या मुलीला पुण्यात भाड्याने फ्लॅट हवा होता. त्यानिमित्त ते खासगी कारने पुण्यात आले होते. शिवाजीनगर येथील हॉटेल अ‍ॅम्बॅसिडर येथे थांबले होते. यावेळी मित्राने पुण्यात आल्यानंतर दुसरी कार आणली. त्यामुळे मुंबईहून आणलेल्या कारमधील साहित्य ते दुसऱ्या कारमध्ये ठेवत होते. त्याचवेळी अज्ञाताने उजव्या हातातील सोन्याचे 3 लाख 75 हजारांचे मनगटी ब्रेसलेट नजर चुकवून चोरून नेले. पुढील तपास उपनिरीक्षक के. पी. पाटील करीत आहेत.

Visit : Policenama.com