Diwali-2020 : धनत्रयोदशीला ‘या’ कारणासाठी आवश्य खरेदी केले पाहिजे पितळेची भांडी, ‘हे’ 8 फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पूर्वी लोकांकडे पितळी भांड्यांचा वापर केला जात असे. पितळशिवाय कासे, लोखंड आणि तांब्याची भांडी सुद्धा वापरली जात होती. परंतु, आता सुविधा लक्षात घेऊन पितळचा वापर खुपच कमी झाला आहे.

आता लोकांच्या घरात जास्तीत जास्त स्टीलच्या भांड्यांचा वापर केला जातो. ही भांडी वापरण्यास आणि ठेवण्यास सोपी असतात. परंतु, तरीही पितळेची भांडी पुन्हा वापरात आणली पाहिजेत, कारण या भांड्यांमध्ये तयार केलेले अन्न स्वादिष्ट असतेच, शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा लाभादायक असते.

शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितले आहे पितळचे महत्व

पितळचे महत्व ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रांमध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पितळचा रंग देवगुरू बृहस्पतींशी संबंधीत आहे, यासाठी पितळवर गुरूचे अधिपत्य असते. गुरू ग्रहांची शांती करण्यासाठी पितळचा वापर केला जातो.

पितळी भांड्याचे हे आहेत लाभ

1 पितळेचे भांडे लवकर गरम होते. यामुळे गॅस, इंधनाची बचत होते.

2 पितळ धातू मजबूत असतो, भांडी मजबूत असतात.

3 पितळेच्या कलशात ठेवलेले पाणी प्यायल्यास उर्जा मिळते.

4 कन्यादानात पितळी कलशाचा वापर केल्यास ते अति शुभ मानले जाते.

5 बालकाच्या जन्मावेळी नाळ कापल्यानंतर पितळेचे भांडे वाजवले जाते. असे मानले जाते की, यातून पितृगणांना सांगितले जाते की, तुमच्या कुळात पिंडदान करणार्‍या वंशजाचा जन्म झाला आहे.

6 धनप्राप्तीसाठी पोर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णावर शुद्ध तूपाने भरलेला कलश अर्पण केला पाहिजे.

7 वैभवलक्ष्मीच्या पूजेत पितळी दिव्याची ज्योत लावावी.

8 असे म्हटले जाते की, पितळेच्या वाटीत दही भरून पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्यास दुर्भाग्य दूर होते.

धनत्रयोदशीला खरेदी करावे पितळ

असे म्हटले जाते की, भगवान धन्वंतरी यांना पितळचे पात्र अति प्रिय आहे, यासाठी धनत्रयोदशीला पितळी भांडे आवश्य खरेदी करावे. यामुळे भगवान धन्वंतरींचा आशीर्वाद मिळतो.